Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुस्लिम आरक्षण एल्गार मोर्चाला सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबामोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन-डॉ.गणेश ढवळे

मुस्लिम समाजासाठी लागू असलेले 5 टक्के आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ येत्या 17 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या एल्ग

योजनेचा लाभ हीच खरी विकासाची ओळख : चैताली काळे
राष्ट्रवादीचे खा.तटकरे आणि गर्जे यांच्यात खडाजंगी?निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पद टाळल्याने वाद
अकोलेत ‘फुलोकी होली’ समारंभ उत्साहात



मुस्लिम समाजासाठी लागू असलेले 5 टक्के आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ येत्या 17 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार मोर्चाला सामाजिक कार्यकर्त्यांकडून जाहीर पाठिंबा मिळत आहे.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी सहकार्‍यांसह जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लेखी निवेदन सादर करून या मोर्चाला पाठिंबा दर्शविला. तसेच मुस्लिम समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आरक्षणाची मागणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाने या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात सकल मुस्लिम आरक्षण कृती समितीला देखील पाठिंब्याचे पत्र देण्यात आले असून, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनावर शेख मुबीन, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, रामधन जमाले (इंटक, बीड जिल्हाध्यक्ष), अशोक येडे (आम आदमी पार्टी, बीड जिल्हाध्यक्ष, माजी सैनिक), सादेक सय्यद (आम आदमी पार्टी, बीड शहराध्यक्ष), प्रा. डी. जी. तांदळे (जिल्हाध्यक्ष किसान सभा, बीड), सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, सिताबाई भोसले (महिला रिपब्लिकन पार्टी, बीड जिल्हाध्यक्ष) आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सामाजिक संघटनांचा पाठिंबा वाढत असून, 17 एप्रिल रोजी होणार्‍या एल्गार मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS