Homeताज्या बातम्या

कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने स्व. अजित पवार यांना अभिवादन; त्यांच्या कार्याला वाहण्यात आली आदरांजली

कोपरगाव: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या स्मृतींना कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात

परळी पंचायत समिती कार्यालयात स्व. अजितदादा पवार यांना विनम्र अभिवादन! विकास व जनसेवेतील योगदान सदैव प्रेरणादायी: राजवर्धन भोसले
उपवर्गीकरणाविरोधात ३० जूनच्या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन; आझाद मैदानावर ढोर-कक्कया समाजाचे शक्तीप्रदर्शन
कर्मयोगी आबासाहेब काकडे हे देशव्यापी व्यक्तिमत्व: डॉ. पुरुषोत्तम भापकर

कोपरगाव: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या स्मृतींना कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली.

आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या अभिवादन कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याच्या विकासासाठी स्व. अजित पवार यांनी दिलेले योगदान, प्रशासनातील त्यांची कार्यशैली आणि जनतेशी असलेली बांधिलकी यांचा उपस्थितांनी गौरव केला. त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, समता उद्योग समुहाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, नगरसेवक गटनेत्या गौरी पहाडे, निर्मला आढाव, सोनम त्रिभुवन, राजेंद्र वाकचौरे, इम्तियाज अत्तार, संदीप कपिले, राहुल शिरसाठ, शैलेश साबळे, वाल्मिक लहिरे, बाळासाहेब रुईकर, माजी नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, बाळासाहेब आढाव, संदीप पगारे, फकीर कुरेशी, दिनकर खरे, मायादेवी खरे, विजय त्रिभुवन, सोमनाथ आढाव, शुभम काळे, चंद्रकांत धोत्रे, राजेंद्र खैरनार, मनोज नरोडे, अरुण त्रिभुवन, सुनील फंड, वैशाली आभाळे, निता साबळे, विजय बंब, राहुल सोनवणे, सुनिल मोकळ, सचिन परदेशी, जावेद शेख, राजेंद्र उशिरे, अंबादास वडांगळे, गणेश गोसावी, सिद्धार्थ शेळके, हारूण शेख, प्रदीप कुऱ्हाडे, वैभव कानडे, दादा नाईकवाडे, राजेंद्र आभाळे, प्रशांत मोरे, विजय दाभाडे, मयूर राऊत, अजय लोखंडे, तन्मय साबळे, विकी चांदर, हर्षल जैस्वाल, एकनाथ गंगुले, संजय दुशिंग, विनायक सपकाळ, अमोल देवकर, ओम आढाव, सचिन बागले, योगेश वाणी आदी उपस्थित होते.

COMMENTS