Homeताज्या बातम्या

बहिस्थ शैक्षणिक अर्हतेस कार्योत्तर मंजुरीचा मार्ग मोकळा; गटविकास अधिकाऱ्यांना अधिकार मिळाल्याने शिक्षकांना मोठा दिलासा

देवळाली प्रवरा: जिल्ह्यातील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी सेवेत असताना बहिस्थ पद्धतीने किंवा नियमानुसार रजा घेऊन शैक्षणिक अर्हता वाढविली असली,

उपवर्गीकरणाविरोधातील लढा तीव्र; पनवेल ते चेंबूर ‘आरक्षण उपवर्गीकरणाची अंत्ययात्रा’
छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त बीडमध्ये ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन; समता परिषदेचा पुढाकार
राज्यात पुढील ४८ तासांत पावसाचा जोर वाढणार! पुणे, मराठवाडा व विदर्भासाठी सतर्कतेचा इशारा

देवळाली प्रवरा: जिल्ह्यातील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी सेवेत असताना बहिस्थ पद्धतीने किंवा नियमानुसार रजा घेऊन शैक्षणिक अर्हता वाढविली असली, तरी जिल्हा परिषदेची पूर्वपरवानगी न घेतल्यामुळे पदोन्नती, निवडश्रेणी, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आदी प्रशासकीय प्रक्रियेत अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी बहिस्थ अभ्यासक्रमातून प्राप्त झालेल्या वाढीव शैक्षणिक अर्हतेस कार्योत्तर मंजुरी देण्याचे अधिकार संबंधित तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना (BDO) प्रदान करणारे आदेश जारी केले आहेत. अशी माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांनी दिली.

या संदर्भातील मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने २८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या प्राथमिक शिक्षक संघटनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत मांडली होती. या बैठकीस आमदार सत्यजित तांबे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. बहिस्थ पद्धतीने शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेल्या शिक्षकांना कार्योत्तर मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने लावून धरली होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी ११ जून २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार, शिक्षकांनी शैक्षणिक अर्हता वाढविण्यासाठी दिलेल्या बहिस्थ परीक्षा किंवा पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमासंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून विहित नियमांनुसार कार्योत्तर मंजुरी देण्याची कार्यवाही गटविकास अधिकाऱ्यांनी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पूर्वपरवानगी नसल्याने अडचणीत आलेल्या अनेक शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या पदोन्नती, निवडश्रेणी तसेच इतर सेवाविषयक लाभांचा मार्ग मोकळा होणार आहे.

या निर्णयाचे स्वागत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य संघटक बाळासाहेब कदम, जिल्हाध्यक्ष शरद वांढेकर, सुनील शिंदे, विलास लवांडे, सुधीर बोऱ्हाडे, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप चक्रनारायण, सुरेश नवले, दत्तात्रय परहर, संदीप भालेराव, रामप्रसाद आव्हाड, शिवाजी ढाकणे, भारत शिरसाठ, पांडुरंग देवकर, रज्जाक सय्यद, नंदू गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता उदबत्ते, जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके, उज्वला घोरपडे, संगीता निगळे, मनीषा क्षेत्रे, सविता नागरे, सुरेखा बळीद तसेच शिक्षक बँकेच्या माजी संचालिका संगीता निमसे यांनी केले आहे.

पूर्वपरवानगीचा अडसर दूर: राजेंद्र निमसे

“जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी बहिस्थ पद्धतीने पदवी व इतर शैक्षणिक अर्हता प्राप्त केली होती. मात्र कार्यबाहुल्य किंवा अनावधानाने जिल्हा परिषदेची पूर्वपरवानगी घेणे राहून गेल्याने टीईटी परीक्षा, निवडश्रेणी आणि पदोन्नती प्रक्रियेत अडथळे निर्माण होत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या कार्योत्तर मंजुरीच्या आदेशामुळे अशा शिक्षकांना मोठा प्रशासकीय दिलासा मिळाला आहे,” असे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांनी सांगितले.

COMMENTS