Homeताज्या बातम्या

जग हादरले! व्हेनेझुएलामध्ये ७.५ तीव्रतेचा प्रलयंकारी भूकंप, जपानलाही ६.९ तीव्रतेचे धक्के; १० हजारांहून अधिक मृत्यूची भीती

काराकस: जगभरात अनेक ठिकाणी गुरुवारी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले असून, दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपाने प्रचंड विध्वं

विशेष सखोल पुनर्निरक्षण मोहिमेत नांदेड दक्षिणची 99 टक्के प्रगती
ड्रग्सच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देणारा पोलिस अखेर निलंबित! मुंबई पोलिसांची कारवाई, राजकीय वातावरण तापले
संजीवनीच्या ७ विद्यार्थ्यांना परदेशात इंटर्नशिपची संधी; एका विद्यार्थिनीची उच्च शिक्षणासाठी जर्मनी येथे निवड
व्हेनेझुएलात सर्वात भीषण भूकंप; दोन मोठ्या धक्क्यांनी राजधानी हादरली, हजारो  नागरिकांचा बळी गेल्याची भीती - Marathi News | Powerful Quakes Rock  Venezuela ...

काराकस: जगभरात अनेक ठिकाणी गुरुवारी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले असून, दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपाने प्रचंड विध्वंस केला आहे. व्हेनेझुएलामध्ये ७.२ आणि ७.५ तीव्रतेचे दोन लागोपाठ शक्तिशाली भूकंप आले असून यामुळे सर्व होत्याचं नव्हतं झालं आहे. अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने आलेल्या या विनाशकारी धक्क्यांमुळे राजधानी काराकसमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. हा गेल्या १०० वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, जपानमध्येही ६.९ तीव्रतेचा मोठा भूकंप जाणवला आहे.

२२ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली

व्हेनेझुएला येथे आलेला भूकंप इतका शक्तिशाली होता की, तेथील स्थानिक वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी आलेल्या या धक्क्यांमुळे एक २२ मजली इमारत एखाद्या पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळली. या भीषण दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून राजधानी काराकसमध्ये सध्या कमालीचे घबराटीचे वातावरण आहे. भीतीने लोक रस्त्यावर आणि घराबाहेर पळत सुटले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या (USGS) प्राथमिक अंदाजानुसार, या महाभयंकर आपत्तीमध्ये मृतांचा आकडा १० हजारांपेक्षा अधिक असण्याची भीती वर्तवली जात आहे. सध्या युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

COMMENTS