बीड : बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि प्रशासकीय कामात शिस्त व तत्परता जपणारे लोकप्रिय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षे

बीड : बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि प्रशासकीय कामात शिस्त व तत्परता जपणारे लोकप्रिय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या खास प्रसंगी प्राध्यापक जे. पी. शेळके आणि बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्यासह महाराष्ट्र तायक्वांदोचे अध्यक्ष श्री. अविनाश बारगजे, क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी तसेच विविध क्रीडा व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ प्रदान केला व वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या कार्यशैलीचे व प्रशासकीय कौशल्याचे मनापासून कौतुक केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील क्रीडा, शिक्षण आणि इतर सर्वंकष विकासात्मक कामांना मोठी गती मिळत असल्याचे प्रा. जे. पी. शेळke व क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी नमूद केले. तसेच महाराष्ट्र तायक्वांदोचे अध्यक्ष श्री. अविनाश बारगजे व उपस्थित क्रीडा क्षेत्रातील पदाधिकार्यांनी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला आणि खेळाडूंना मिळणार्या पाठबळाबद्दल जिल्हाधिकार्यांचे विशेष आभार मानले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी उपस्थितांचे आभार मानत, बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि क्रीडा संस्कृतीला अधिक बळकटी देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी क्रीडा विभागातील अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS