कर्जत नगरपंचायतीतील एक प्रभाग ठरला कळीचा; निवडणूक रद्द करण्याची भाजपची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत नगरपंचायतीतील एक प्रभाग ठरला कळीचा; निवडणूक रद्द करण्याची भाजपची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीतील प्रभाग 14 हा कळीचा ठरला आहे. या प्रभागातील भाजपच्या उमेदवारास प्रलोभन दाखवून जबरदस्तीने पक्षांतर

बाबूजी आव्हाड महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात
नुकसानीचे पंचनामे करण्याच्या आ. काळेंच्या तहसीलदारांना सूचना
 शेतातील विहिरीतील मोटार व  पाईपची चोरी 

अहमदनगर/प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीतील प्रभाग 14 हा कळीचा ठरला आहे. या प्रभागातील भाजपच्या उमेदवारास प्रलोभन दाखवून जबरदस्तीने पक्षांतर करण्यास राष्ट्रवादीने भाग पाडल्याचा दावा भाजपने केला आहे व यामुळे कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा व या प्रभाग 14ची निवडणूक प्रक्रिया रद्द केली जावी, अशी मागणी भाजपचे मुंबई प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांच्याकडे केली आहे.
कर्जत नगरपंचायतीची निवडणूक आज 21 डिसेंबर रोजी होणार आहे. येथील विद्यमान आमदार पवार व भाजपचे माजी आमदार प्रा. राम शिंदे यांच्यात या नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवण्याची जोरदार चुरस सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर मतदानाच्या एक दिवस आधी भाजपने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याने व प्रभाग 14ची निवडणूक रद्द करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता यावर आयोग काय भूमिका घेते, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.

सत्तेच्या बळाचा गैरवापर
भाजपने निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारीत, वॉर्ड क्र.14 या कर्जत नगर पंचायत निवडणुकीत स्थानिक आमदार रोहित पवार यांच्याकडून सत्तेच्या बळावर दबावतंत्राचा वापर करुन गैरप्रकार होत असल्याचा दावा केला आहे. यात पुढे म्हटले आहे की, वॉर्ड क्र.14 – कर्जत नगरपंचायत निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवार शिबा तारेक सय्यद यांची
प्रचारसभा प्रा.राम शिंदे (भाजपा नेते व माजी मंत्री) आणि खासदार डॉ. सुजय विखे यांनी दि. 17 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता घेतली होती आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता शिबा सय्यद यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
कर्जत नगरपंचायत मतदार संघात निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपाच्या उमेदवारांना कोणत्याना कोणत्या मार्गाने प्रभावित करुन उमेदवारी मागे घेण्याबाबत स्थानिक आमदार रोहित पवार यांनी जबरदस्तीने व सत्तेचा दबाव टाकून बळी पाडले आहे, ही बाब निंदनीय असून निवडणुकीत राजकीय दबावतंत्राचा वापर करुन व दहशत निर्माण करुन भाजपाच्या उमेदवारांना संभ्रमित करण्याचा डाव आमदार पवार यांनी आखला आहे, असा आरोप करून या पत्रात म्हटले आहे की, आमदार पवार व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून नगरपंचायत निवडणुकीतील भाजपा उमेदवारांना प्रलोभन दाखवून जबरदस्तीने पक्षांतर करण्यास भाग पाडणे, सत्तेचा दबाव टाकून मतदारसंघात दहशत निर्माण करणे इत्यादी बाबी निदर्शनास आल्या असून त्यांच्याकडून आदर्श आचारसंहितेचा उघडउघड भंग झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. निवडणूकआचारसंहितेच्या कालावधीत आमदार पवार व राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून झालेल्या आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याकरिता व असे प्रकार प्रत्यक्षदर्शनी उघड झाले असल्याने वॉर्ड क्र.14 – कर्जत नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

COMMENTS