बीड : येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ रोजी स्वच्छता मोहिमे अं

बीड : येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ रोजी स्वच्छता मोहिमे अंतर्गत विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद आणि कर्मचारी वृंद यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली व सोबतच स्वच्छता मोहिमेची जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील होते. त्यांनी स्वच्छता विषयक व प्लास्टिक वापराबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर रमेश वारे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. हुसेनी एस.एस, कार्यक्रमाधिकारी प्रा. शोएब पिरजादे तसेच प्राध्यापिका डॉ. शामल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS