पालकत्व स्वीकारण्यास असमर्थता दाखवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्या

पालकत्व स्वीकारण्यास असमर्थता दाखवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

बाळाला मिळाला स्नेहालयाचा आधार.

अभिजित खंडागळे/पाथर्डी : शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मोहटादेवी रोडवरील मूकबधिर शाळेजवळ साधारण आठ ते दहा दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक

कर्जत नगरपंचायतीतील गटनेते बदल प्रकरणाची सुनावणी ५ मे रोजी
रस्ता मंजूर होऊनही विद्यार्थ्यांची चिखलातून कसरत  
विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी वाणिज्य मंडळाची गरज ः  प्राचार्य डॉ. भोर

अभिजित खंडागळे/पाथर्डी : शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मोहटादेवी रोडवरील मूकबधिर शाळेजवळ साधारण आठ ते दहा दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक बेवारस अवस्थेत सापडल्याची, मानवतेला काळिमा फासणारी घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली;दरम्यान पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध जन्म देऊन पालकत्व स्वीकारण्यास असमर्थता दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या फोनवर दत्तात्रय बडे (रा.पाथर्डी) यांनी मोहटादेवी रोडला मुकबधीर शाळेच्या जवळ एक नुकतेच जन्मलेले मुलं कपड्यात लपेटून कोणीतरी आणून ठेवल्याची माहिती दिल्यानंतर सदरील ठिकाणी पोलीसानी तातडीने धाव घेत ते मुलं ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याला आणत बाल कल्याण विभाग,शासकीय रुग्णालय,अहमदनगर चाईल्ड लाईन या संस्थेला या घटनेबाबत माहिती कळवली.सदरील बाळाला पोलिसांनी रात्री स्नेहालय संस्थेच्या ताब्यात दिले आहे.घटनेचा पुढील तपास पो.हे.कॉ.एस.जी रोकडे करत आहे.

COMMENTS