उत्तर प्रदेश : आव्हानांचा स्विकार आणि…

Homeताज्या बातम्यासंपादकीय

उत्तर प्रदेश : आव्हानांचा स्विकार आणि…

 उत्तर प्रदेशच्या राजकारणात सपा बसपा हे दोन्ही पक्ष एकमेकांचे विरोधक म्हणूनच काम करत असले तरी देशातील जनता त्यांना सामाजिक पातळीवरचे मित्र मानत असते.

बँकिंग व्यवस्था रिझर्व्ह बँकेमुळेच मजबूत
 शेतकऱ्यावर धारदार शस्त्राने वार करुन खून
लग्न मंडपातून निघाली नवरदेवाची अंत्ययात्रा

 उत्तर प्रदेशच्या राजकारणात सपा बसपा हे दोन्ही पक्ष एकमेकांचे विरोधक म्हणूनच काम करत असले तरी देशातील जनता त्यांना सामाजिक पातळीवरचे मित्र मानत असते. पण या दोन्ही पक्षांच्या कार्यपद्धतीत आणि नेतृत्वाच्या कार्यपद्धती काही मूलभूत बदल आणि फरक आहेत. बहुजन समाज पक्ष हा मायावतींचा पक्ष विधानसभेत जर पराभूत झाला किंवा त्यांना जागा कमी मिळाल्या तर मायावती या खासदारकीचा राजीनामा देत नाही. त्यांना राज्याची सत्ता मिळाली तर ते खासदारकीचा राजीनामा देतात आणि राज्याचे नेतृत्व स्वीकारतात. तर दुसऱ्या बाजूला समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी आता उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्ष म्हणून त्यांचा पक्ष उभा राहिल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. याचाच अर्थ राज्यात आगामी जी आव्हाने आहेत ते विधानसभेच्या पटलावर मांडून त्यावर जनतेच्या प्रश्नावर लढत राहणं हे आव्हान त्यांनी स्वीकारला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील राजकीय सत्ता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने राखली आहे. यावेळी त्यांच्या जागा कमी झाल्या असल्या तरी २५५ एकूण आमदार त्यांचे निवडून आल्यामुळे त्यांची सत्ता ही कायम आहे! परंतु अखिलेश सिंग यादव यांनी उत्तर प्रदेश विधानसभा आपला आवाज बुलंद करण्याचा निर्धार जाहीर केल्यामुळे त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील जनतेवर आणि राज्याचे एकूण प्रश्न सोडविण्यासाठी आगामी काळात समाजवादी पक्ष किती आक्रमक राहणार आहे याची झलक दिसते. तसं पाहिलं तर अखिलेश यादव आणि मायावती यांच्या नेतृत्वाची तुलना करता येणार नाही कारण अखिलेश यादव हे तरुण आहेत आणि मायावती यांचा ज्येष्ठ राजकीय नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.  शिवाय दोघांचीही राजकारण करण्याची पद्धत वेगळी आहे मायावती या सत्तेची सुरक्षितता लाभल्याशिवाय राज्यामध्ये थांबत नाही; तर अखिलेश यादव हे विरोधी पक्ष म्हणून राज्याच्या राजकारणामध्ये अधिक रस घेतात आणि सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही राजकीय पक्षांना एक विचारधारा आहे समाजवादी पक्षाला राम मनोहर लोहिया यांची विचारधारा आहे, तर बसपाला फुले शाहू आंबेडकरी यांची विचारधारा आहे. अर्थात एससी एसटी ओबीसी धार्मिक अल्पसंख्यांक हा बहुजन समाज म्हणून व्याख्यान कित होणारा प्रवर्ग हा खासकरून फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा घटक आहे असे देशामध्ये वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय या प्रवर्गातील सर्व सामाजिक घटकांमध्ये आता विचार करणारे तरूण कार्यकर्ते निर्माण झाल्यामुळे या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या दोन्ही पक्षांमध्ये एक समेट व्हावा, यासाठी मोठ्या पातळीवर प्रयत्न करण्यात येतात. परंतु नेत्यांच्या आपसी राजकीय स्वभावामुळे त्यामध्ये फार काही घडून येत नाही, असे आजपर्यंत दिसते. देशाचे राजकारण आता एकंदरीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीकडे टक लावून बसले आहे, परंतु तत्पूर्वी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीची रंगीत तालीम हे देखील सर्व राजकीय पक्षांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. या निवडणुकीत आता बहुजन समाज पक्षाची काहीही भूमिका दिसणार नाही कारण त्यांची शक्ती पूर्णतः शेन झाल्याचे आपल्याला दिसते आहे. परंतु समाजवादी पार्टी राष्ट्रपती निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना दिसेल. देशातील सर्व राज्यातील प्रादेशिक पक्षांनी मिळून जर ठरवले आणि काँग्रेसने राष्ट्रीय पक्ष म्हणून यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याची भूमिका जर घेतली, तर, निश्चितपणे आगामी काळामध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून तर लोकसभा निवडणुकीपर्यंत देशाचे वातावरण वेगळ्या पद्धतीने निर्माण होईल; हे मात्र नाकारता येणार नाही. परंतु उत्तर प्रदेशचे राजकारण जातीजातीमध्ये यापूर्वीच विभाजीत झालेले आहे ते आता फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये एससी, एसटी, ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्यांक यांना सोबत घेऊन राजकीय पटलावर उभे राहिल आणि त्याचे परिणाम नक्कीच येणाऱ्या काळात दिसतील, असे आता देशातील प्रादेशिक पक्षांमध्ये कुजबुज सुरु झाली आहे. 

COMMENTS