Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरण कार्यालयावर संगमनेरातील नागरिकांचा संतप्त मोर्चा

संगमनेर : मागील एक वर्षापासून संगमनेर शहरामध्ये वाढलेली अस्वस्थता, नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वाढलेली अस्वच्छता, अनियमित पाणी व वीज पुरवठा, विजे

माजी आ. भीमराव धोंडे करणार राष्ट्रवादीत प्रवेश
नांदेड उत्तरमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी डिजिटल शाळांचा संकल्प; रंगभरण स्पर्धेला 3,500 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादसंध्याताई फाऊंडेशनच्या उपक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा व मुख्याध्यापकांचा गौरव
गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात शवविच्छेदन; नायगाव ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
Displaying 1a40b524-ca24-4a75-8f52-4a4a62677673.jpg

संगमनेर : मागील एक वर्षापासून संगमनेर शहरामध्ये वाढलेली अस्वस्थता, नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वाढलेली अस्वच्छता, अनियमित पाणी व वीज पुरवठा, विजेचा खेळ खंडोबा या गोष्टींमुळे नागरिक त्रस्त झाली असून संगमनेर शहरातील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र निषेध करत आंदोलन केले.

संगमनेर शहरातील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर वीज पुरवठा नियमित करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी योगेश जाजू,अफजल शेख, संदीप लोहे,सुरेश झावरे,किरण पाटणकर,हैदर अली,निरंजन सातपुते,प्रमोद गणोरे, सागर कानकाटे, शैलेश कलंत्री, अंबादास आडेप, प्रशांत कडलक, राजेंद्र वाकचौरे, शरीफ पठाण,अफजल अहमद शेख, नूर मोहम्मद शेख,दत्तात्रय थोरात,शुभम परदेशी, श्रीमती एखंडे मॅडम यांच्यासह विविध नागरिक उपस्थित होते. यावेळी ठिय्या आंदोलन करत नागरिकांनी वीज वितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली.

या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर शहरातील अनेक ठिकाणी वीज वितरणाच्या फार समस्या जाणवत असून अनियमित वीज पुरवठा होतो आहे. कमी जास्त दाबाने होणारा पुरवठा यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याचबरोबर रहदारीच्या रस्त्यांवर वीज वाहकतारांना पडलेला जोड मेन लाईनच्या हाय व्होल्टेज लाईन ला संरक्षण कवच नसल्याने अनेक ठिकाणी जीवितेचा धोका निर्माण झाला आहे. याचबरोबर इंदिरानगर भागातील वीज वारंवार सकाळी पाणी आले की नेहमी जाते. अनेक ठिकाणी पोल दुरुस्तीचे काम रखडले आहे.

शहरालगच्या भागात व ग्रामीण भागातही विजेची मोठी समस्या असून यामुळे सर्व नागरिक शेतकरी व्यापारी आणि उद्योग क्षेत्रांना अडचणीचा सामना करावा लागतो. विशेषता ग्रामीण व शहरी भागांमध्ये वेळेवर वीजपुरवठा न झाल्याने अनेक कामे प्रलंबित राहतात त्यामुळे वीज वितरण विभागाने तातडीने नियमित वीज पुरवठा करावा. तारा दुरुस्त कराव्या. अशी मागणी करण्यात आली.

यावेळी निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती एखंडे मॅडम म्हणाल्या की, संगमनेर मध्ये वारंवार वीज वितरण कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी लाईट जात असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे तर हायदर आली हा युवक कार्यकर्ता म्हणाला की, अनेक वेळा लाईट जात असल्याने रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे या सर्व घटना ला वीज वितरण कार्यालय जबाबदार असून तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी त्यांनी केली.

या ठिय्या आंदोलनानंतर मुख्य अभियंता वट्टमवार यांनी निवेदन स्वीकारले. लवकरात लवकर मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिले. वेळेत मागण्या पूर्ण न झाल्यास संगमनेर बस स्थानकासमोर दिवसभर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संगमनेर मधील तमाम नागरिक व महिलांनी दिला आहे.

COMMENTS