महिला…कुटुंबाच्या आधारवड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला…कुटुंबाच्या आधारवड

अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी केला महिलांचा सन्मान

अहमदनगर/प्रतिनिधी : कुटुंबाचा आधारवड असलेल्या ज्येष्ठ महिलांचा सन्मान करुन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी (8 मार्च) महिला दिन उत्साहात साजरा

महाविकासच्या भारनियमाला राष्ट्रवादीचा पहिला विरोध
पत्रकारांना खुलासा विचारणे चुकीचे ; जिल्हाधिकारी डॉ. भोसलेंनी घेतली मनपा आयुक्त गोरेंची झाडाझडती
मानोरीत भर दिवसा बिबट्याचा धुमाकुळ

अहमदनगर/प्रतिनिधी : कुटुंबाचा आधारवड असलेल्या ज्येष्ठ महिलांचा सन्मान करुन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी (8 मार्च) महिला दिन उत्साहात साजरा केला. घरातील ज्येष्ठ महिला त्या कुटुंबासह समाजव्यवस्थेचा कणा असतात, असे प्रतिपादन यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केले.
भिंगार येथील ज्येष्ठ नागरिक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात प्रा. विधाते व भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी ज्येष्ठ महिलांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, नाथा राऊत, प्राचार्य कैलास मोहिते, रमेश वराडे, दीपक बडदे, मेजर दिलीप ठोकळ, सुभाष होडगे, अर्जुन बेरड, सिध्दार्थ आढाव, मारुती पवार, विशाल बेलपवार, योगेश करांडे, राधेलाल नकवाल, सर्वेश सपकाळ, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पोपट नगरे, शशिकांत बोरुडे, अनंत सदनापूर, भगवान दळवी, दिलीप बोंदर्डे, अशोक पराते, सुंदर पाटील, अशोक पवार आदींसह ज्येष्ठ महिला उपस्थित होत्या. प्रा. विधाते म्हणाले की, पुरुषाला योग्य दिशा देण्याचे कार्य ही आई, पत्नी, बहिणीच्या रुपाने महिला करीत असते. ज्येष्ठ महिलांना कुटुंबात आदराचे स्थान देऊन त्यांचे मार्गदर्शन भावी पिढीसाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सपकाळ म्हणाले की, ज्येष्ठ महिलांमुळेच संस्कार व संस्कृती टिकून आहे. त्यामुळे महिला दिनी त्यांचा मान-सन्मान व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
येथील संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत जागतिक महिलादिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक स्तर उंचावल्यास स्त्री-पुरुष समानता शक्य असल्याचे प्रतिपादन यावेळी उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड यांनी केले. स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे श्रीलक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत झालेल्या जागतिक महिलादिन कार्यक्रमात मेकअप आर्टिस्ट अनुजा कांबळे, ब्युटीपार्लरच्या दीपा भागवत, सुषमा साळी, वनिता पाटेकर, मंगलाताई मानकर या कर्तृत्ववान महिलांचा तसेच ज्ञानदानाचे कार्य करणार्‍या महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारत दूरसंचारच्या अभियंत्या सुचिता ढगे, व्हाईस चेअरमन मृणाल कनोरे, सुरेखा शेकटकर, छाया साळी, नलिनी कनोरे, शैलजा मानकर, आरती लांडगे, वैद्य, प्रा.अनुराधा मिसाळ, स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे सचिव गजेंद्र सोनवणे, शालेय समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे,सचिव सुनील पावले,संचालक संजय सांगावकर,बाबासाहेब वैद्य,महेश कांबळे, ढगे,विश्‍व हिंदू परिषदेचे मुकुल गंधे, मुख्याध्यापिका कल्पना भामरे उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी आव्हाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक जगन्नाथ कांबळे यांनी केले. कार्यक्रमासाठी जगन्नाथ कांबळे, सुलभा तरवडे, शुभदा भांबरे,मीनाक्षी पटारे,सुशिलकुमार आंधळे,राजेंद्र गर्जे आदींनी परिश्रम घेतले.

आगडगावला आरोग्य तपासणी
नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत युवक कल्याण योजनेमार्फत उडान फाउंडेशनच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त आगडगाव (ता. नगर) येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात महिलांची नेत्र व दंत तपासणीसह आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच कोरोना काळात उत्कृष्ट आरोग्य सेवेचे कार्य करणार्‍या आशा स्वयंसेविका रंजना थोरात, वैशाली शिंदे, लंका कराळे, मीरा साळुंके, सुनीता कराळे यांना पुस्तके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आगडगाव येथील काळभैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे, व्यवस्थापक नामदेव कराळे, दिलीपकुमार गुगळे, ग्रामविकास अधिकारी खाडे, निर्मला बोरुडे, भागुजी कराळे, साहेबराव गायकवाड, अ‍ॅड. ह.भ.प. सुनील तोडकर, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, डॉ. अमित पिल्ले, सचिन सोनवणे, उडान फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे, भारती शिंदे उपस्थित होते. महिला ही कुटुंबाचा कणा आहे. महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहिल्यास कुटुंबाचे आरोग्य तिच्याकडून जपले जाते, असे यावेळी कराळे म्हणाले. या कार्यक्रमात शंभर टक्के मतदानासाठी मतदार जागृती करण्यात आली. कार्यक्रमासाठी संदीप वाघुले, शुभम शिंदे, आजिनाथ पागिरे, सागर शिंदे, राधा कराळे, पल्लवी कन्हेरकर, सतीश बनसोडे आदींनी परिश्रम घेतले. आभार अक्षय शिंदे यांनी मानले.

पारितोषिक वितरण उत्साहात
जागतिक महिला दिनानिमित्त येथील सरस्वती हॉस्पिटल व इनरव्हिल क्लब ऑफ अहमदनगर व्हिनसच्यावतीने ‘माझा संदेश… अभिमान आहे स्त्री असल्याचा’ या विषयावर व्हिडिओ संदेश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक वैशाली चोपडा (नगर) यांना मिळाला. व्दितीय क्रमांक डॉ.हिना इनामदार (जुन्नर), मृण्मयी कुलकर्णी (तृतीय), उत्तेजनार्थ पारितोषिक मीरा बेरड, पूनम वाच्छाताणी, उषा शेटिया, वर्षा अष्टेकर, शुभांगी माने, आशा भालेराव यांना मिळाले. स्नेहालय संस्थेच्या डॉ.प्राजक्ता गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. यावेळी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.अमोल जाधव, नगरसेविका सुवर्णा जाधव, प्रगती गांधी, मीनाताई सत्रे, सीमा कोहिणकर, अर्पिता शिंगवी आदी उपस्थित होते. आताच्या काळात महिला कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेली नाही. जितक्या समर्थपणे ती कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडते, त्याच ताकदीने नोकरी-व्यवसायातही ठसा उमटवते. यामुळे महिला शक्तीप्रती खरा आदरभाव निर्माण होतो, असे प्रतिपादन डॉ. कुलकर्णी यांनी यावेळी केले. सरस्वती हॉस्पिटलने यापूर्वीही महिलांसाठी दिल ये जिद्दी है, जोडी तुझी माझी, गरोदर मातांसाठी रॅम्प वॉक असे उपक्रम राबवले. व्हिडिओ संदेश स्पर्धेत नगरसह पुणे, नाशिक जिल्ह्यातील महिलांनी सहभाग घेतला. महिला म्हणून कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना नोकरी, व्यवसायात आलेले अनुभव महिलांनी मांडले तसेच घरातील सर्व नात्यांमध्ये समतोल साधत त्यांनी कशा पध्दतीने मार्गक्रमण केले, याचेही अनुभव कथन व्हिडिओंमध्ये होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून त्रिवेणी भोंदे, अनुराधा भंडारे व मंदा चिटणीस यांनी काम पाहिले.

मो़फत योग मार्गदर्शन
कुष्ठधाम रोडवरील योगभवनात योग विद्या धामतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत योगासन प्राणायाम वर्ग सुरू असून, हे वर्ग रोज सकाळी 6 ते 7, 7 ते 8 व सायंकाळी 5 ते 6 या वेळेत होत आहे. या उपक्रमासह संशोधन विभागाच्या ग्रंथालयाचे उदघाटन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुंदर गोरे, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, उपाध्यक्ष विनायक पवळे, कार्याध्यक्ष जयंत वेसीकर, संस्थापक सदस्य शाम शर्मा, दत्ता दिकोंडा, वैशाली एकबोटे, नगरसेविका संध्या पवार, कार्यवाह अंजली कुलकर्णी, महिला आघाडी प्रमुख मीना देशपांडे उपस्थित होते.

आरोग्य शिबीर सुरू
महिलांमध्ये स्तन व गर्भाशय पिशवीच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी तसेच निरोगी आरोग्यासाठी लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व श्रीदीप हॉस्पिटलच्यावतीने महिला दिनानिमित्त आठ दिवसीय तपासणी शिबीर सुरू करण्यात आले आहे. या शिबिराचे नुकतेच उदघाटन झाले. यावेळी अ‍ॅड. ममता नंदनवार, डॉ. सारिका झरेकर, डॉ. दत्तात्रय अन्दुरे, डॉ. तेजश्री जुनागडे, डॉ. मीरा बडवे, डॉ. विनोद गाडेकर, गीता देशमुख, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. अमित बडवे, खजिनदार विपुल शहा, सचिव सुनील छाजेड, प्रिती शहा, भावना छाजेड, डॉ. सिमरन वधवा, डॉ. अंजू घुले, सहेजकौर वधवा उपस्थित होते.

COMMENTS