Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत निरंकारी मिशनच्या वतीने आज रक्तदान शिबीर

‘मानव एकता दिवस’ निमित्त शिबिराचे आयोजन

अहमदनगर ः येथील संत निरंकारी मिशनच्या वतीने बाबा गुरबचनसिंहजी महाराजांच्या 44 व्या स्मृतीदिनानिमित्त बुधवार 24 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय भव्य रक्त

केज तालुक्यातील येवता येथे राजमाताअहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त जय मल्हार मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.
म.ज्यो.फुले महाविद्यालयात रक्तदान शिबीर
अखिल भारतीय स्थनिक स्वराज्य संस्था, नाशिक येथे झालेल्या  रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

अहमदनगर ः येथील संत निरंकारी मिशनच्या वतीने बाबा गुरबचनसिंहजी महाराजांच्या 44 व्या स्मृतीदिनानिमित्त बुधवार 24 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले असून, मिस्कीन रोड स्थित निरंकारी सत्संग भवन, नगर येथे सकाळी 9 ते 3 या वेळेत शिबीर पार पडेल.
यंदाचे हे 27 वे वर्ष असून, मागील शिबीरात 194 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. यंदा 200 च्या पुढे युनिट रक्त संकलित होईल. या दृष्टीने निरंकारी सेवा दलाच्या वतीने छापिल पत्रक, पोस्टर्स, फ्लेक्स बोर्ड, सोशल मिडिया, वैयक्तिक संपर्काच्या माध्यमाने प्रयत्न केले जात असल्याचे मंडळाचे नगर झोन प्रमुख हरिश खुबचंदानी यांनी सांगितले. तसेच बाबा गुरबचन सिंहजी यांना श्रद्धासुमन अर्पित करण्यासाठी सत्संगचे आयोजन सकाळी 9 ते 12 या वेळेत निरंकारी सत्संग भवनच्या प्रांगणात केले आहे. मानवाला एकत्वाच्या सूत्रात गुंफणारा ‘मानव एकता दिवस’ चे कार्यक्रम मंडळाच्या देशभरातील शाखांमध्ये व विदेशात साजरा केला जाईल. रक्तदान शिबीर विषयी अधिक माहिती देतांना खुबचंदानी यांनी सांगितले की, संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या सहकार्याने 24 एप्रिल रोजी देशव्यापी महारक्तदान अभियानाचे आयोजन मिशनच्या सर्व 65 झोनमधील 207 ठिकाणी केले जाईल. यात अंदाजे 40 ते 50 हजार युनिट रक्त संकलित होईल. 1986 साली बाबा हरदेव सिंहजी महाराजांनी सुरु केलेल्या रक्तदान मोहिमने महाअभियानाचे रुप धारण केले असून, या शिबीराद्वारे आतापर्यंत 13,31,906 युनिट रक्त संकलित करुन गरजू रुग्णांसाठी रक्तपेढ्यांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. तरी रक्तदान शिबीरात मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन समस्त नगरवासियांना निरंकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच सत्संग प्रवचन कार्यक्रमाचाही भाविकांनी लाभ घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

COMMENTS