लॉटरीतून मिळणार गरीब मुलांना मोफत शाळा प्रवेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लॉटरीतून मिळणार गरीब मुलांना मोफत शाळा प्रवेश

3 हजार जागांसाठी 7 हजार अर्ज

अहमदनगर/प्रतिनिधी : राईट टू एज्युकेशन (आरटीई) म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार गरीब विद्यार्थ्यांना नामवंत शाळांतून मोफत प्रवेश दिला जात असला तरी यंदा

शासकीय योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये : तहसीलदार विजय बोरुडे
बाबासाहेब भोस यांची शरद पवार गटात घरवापसीचे संकेत
स्वस्तात सोने देणार अखेर पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर/प्रतिनिधी : राईट टू एज्युकेशन (आरटीई) म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार गरीब विद्यार्थ्यांना नामवंत शाळांतून मोफत प्रवेश दिला जात असला तरी यंदाचा हा प्रवेश लॉटरीद्वारे निश्‍चित होणार आहे. जिल्ह्यात आरटीई मोफत प्रवेशाच्या 3 हजार 58 जागांसाठी 6 हजार 957 विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत व या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील नोंदणीकृत 400 शाळांतून प्रवेश दिले जाणार आहेत. उपलब्ध जागांपेक्षा जवळपास दुप्पट अर्ज आल्याने आता लॉटरीद्वारे निवडल्या जाणार्‍या गरीब विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश होणार आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई 2009) अंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. अहमदनगर जिल्ह्यातील आरटीई अंतर्गत नोंदणीकृत 400 शाळांमधील प्रवेशासाठी 6 हजार 957 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, 25 टक्के राखीव निकषानुसार फक्त 3 हजार 58 जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थी निवड जिकरीची होणार असून, यासाठी लॉटरी पद्धत अवलंबली जाणार आहे.
आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी दि. 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, अनेक शाळांना आरटीई प्रवेशाच्या नोंदणीसाठीच वेळ लागल्यामुळे अनेक पालकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्याचे शिक्षण संचालनालयाच्या लक्षात आले. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व त्याची प्रवेशाची संधी वाया जाऊ नये, यासाठी आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी दि. 10 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार आता ही अर्ज प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार्‍या शाळांची संख्या 400 आहे. तेथील 25 टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी प्रवेशाच्या एकूण जागा 3 हजार 58 आहेत. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचा निवासी पुरावा म्हणून शिधापत्रिका (रेशनकार्ड), पालकांचा वाहन चालविण्याचा परवाना, वीज अथवा दूरध्वनी बिल, मिळकत कर देयक, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. दरम्यान, आरटीई प्रवेशांतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया संपली असून पुढील टप्प्यात शिक्षण विभागाकडून प्रवेशासाठी एकत्रितपणे राज्यस्तरीय लॉटरीची प्रक्रिया होणार आहे.

COMMENTS