Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगुरु बंकटस्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नेकनूर  : स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्रीगुरु बंकटस्वामी महाराज यांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात भव्य रक्तदान शिबिराचे

श्रीगोंद्यात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
वारकरी संप्रदायात परिवर्तनाची घडी संत बंकटस्वामी यांनी बसवली – श्री ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्रीपुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प मोठ्या थाटात संपन्न
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पुढाकारबाभूळवाडीत महा आरोग्य शिबिरातून आरोग्यसेवेचा प्रेरणादायी आदर्श

नेकनूर  : स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्रीगुरु बंकटस्वामी महाराज यांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास भाविक, वारकरी व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
बंकटस्वामी मठाचे मठाधिपती ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार या शिबिराचे योग्य नियोजन करण्यात आले. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हा सामाजिक संदेश पुढे नेत धार्मिक वातावरणात हा सेवाभावी उपक्रम अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पडला. दि. 1 मे 2026 रोजी पार पडलेल्या या शिबिरात संकलित झालेले रक्त गरजू रुग्णांच्या उपचारासाठी जीवनदायी ठरणार असून, आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे व सहकार्य करणार्‍या सर्वांचे आभार मानले.

COMMENTS