Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बलभीम महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

बीड : येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दि. 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात

महाराष्ट्र दिनापासून मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलनाची तयारी; आज जामा मस्जिद येथे महत्त्वाचा मशवेरा
तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
पोलीस निरीक्षक मुख़्तारखान पठाण यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान

बीड : येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दि. 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
बलभीम महाविद्यालय विकास समितीचे निमंत्रित सदस्य मा. अब्दुल अकील अब्दुल जमील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  याप्रसंगी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत गायन करण्यात आले तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन विरोधी शपथ घेण्यात आली.  यावेळी महाविद्यालय विकास समितीचे निमंत्रित सदस्य मा. अ‍ॅड.सुभाष राऊत, प्राचार्य डॉ.संतोष उंदरे, उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब कोकाटे, डॉ.संतोष डुबल, प्रबंधक पी.पी.डावकर,कार्यालय अधीक्षक किसन सागडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

COMMENTS