Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पुढाकारबाभूळवाडीत महा आरोग्य शिबिरातून आरोग्यसेवेचा प्रेरणादायी आदर्श

बीड : मौजे बाभूळवाडी (ता. जि. बीड) येथे दि. 01 मे 2026 रोजी अखंड हरिनाम सप्ताहाच्या पावन निमित्ताने आयोजित करण्यात आलेले महा आरोग्य शिबिर ग्रामीण

लोणी बुद्रुक येथे सोमवार पासून हरिनाम सप्ताह
श्रीक्षेत्र नेकनूरमध्ये ‘भक्तीपंढरी’ अवतरणार; संत बंकटस्वामी महाराजांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य सोहळा
वारकरी संप्रदायात परिवर्तनाची घडी संत बंकटस्वामी यांनी बसवली – श्री ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्रीपुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प मोठ्या थाटात संपन्न

बीड : मौजे बाभूळवाडी (ता. जि. बीड) येथे दि. 01 मे 2026 रोजी अखंड हरिनाम सप्ताहाच्या पावन निमित्ताने आयोजित करण्यात आलेले महा आरोग्य शिबिर ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित करणारे आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरले.
या शिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, ओ.एस.डी. मंगेश चिवटे, वैद्यकीय महाराष्ट्र राज्य प्रमुख राम राऊत तसेच मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या समन्वयातून, महादेव मातकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा मर्यादित असल्याने अशा शिबिरांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. या शिबिरात नेत्र तपासणी, दंत तपासणी, गुडघे, मान व पाठदुखी, रक्तदाब तसेच मधुमेह यांसह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांना प्राथमिक उपचारांसोबतच योग्य वैद्यकीय सल्ला देण्यात आला. या उपक्रमाला गावकर्‍यांचा आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक नागरिकांनी प्रथमच आरोग्य तपासणी करून घेतली, तर काहींना आजारांचे योग्य निदान होऊन पुढील उपचाराची दिशा मिळाली. त्यामुळे आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यात या शिबिराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होणे सामान्य झाले आहे. अशा वेळी समाजातील जबाबदार घटकांनी पुढाकार घेऊन आरोग्यसेवा जनतेपर्यंत पोहोचविणे ही केवळ सेवा नसून समाजउन्नतीची दिशा ठरते. बाभूळवाडीतील हा उपक्रम सेवा हीच धर्म या विचाराची प्रभावी अंमलबजावणी ठरला आहे. सामाजिक जाणीव आणि सेवाभाव यांच्या जोरावरच समाजाचे आरोग्य आणि भविष्य सुरक्षित राहू शकते. भविष्यातही अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी होणे, हीच ग्रामीण विकासाची खरी गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

COMMENTS