Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंबेडकर विचारांची ताकद दाखविल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत-पप्पू कागदे

बीड : आर्थिकदृष्ट्या मागास समाज बांधवांसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तसेच अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उ

लखीमपुर खिरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवरून वाद; संतप्त जमावाकडून पोलीस गाडीची तोडफोड
श्याम मानव यांनी नांदेड जिल्ह्यात पाय ठेवून दाखवावा- दीपक सातोरे
भीम जयंती शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा गौरव

बीड : आर्थिकदृष्ट्या मागास समाज बांधवांसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तसेच अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी आंबेडकरी विचारांचे युवक संघटित होणे अत्यावश्यक आहे. एकजूट आणि संघटित शक्ती दाखविल्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे आवाहन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले.
ते मौजे देवळा (बु.), ता. वडवणी, जि. बीड येथे रिपाइं नामफलकाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी युवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता संघटित व्हावे, असे त्यांनी सांगितले. शासन दरबारी आपल्या मागण्यांची पूर्तता करून घेण्यासाठीही ही एकजूट आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दलित पँथरच्या माध्यमातून गायरान धारकांसाठी राज्यभर लढा उभारला होता. समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी शासन परिपत्रकाद्वारे सुमारे 2 लाख हेक्टर गायरान जमीन धारकांच्या नावे करून दिली, याची आठवण कागदे यांनी करून दिली. आगामी काळातही गायरान जमिनींसाठी संघर्ष उभारण्याची गरज असून नवीन अतिक्रमित जमिनी धारकांच्या नावे करण्यासाठी लढा द्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले. आंबेडकरी चळवळीशी नाळ जोडलेल्या रिपाइं कार्यकर्त्यांनी अनेक आंदोलने यशस्वी केली असून ही परंपरा पुढे चालू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मौजे देवळा (बु.) येथील रिपाइं शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमास महादेव उजगरे, किसन तांगडे, महादेव बप्पा रेडे, बळीराम कोकाटे, अभिमान कदम, सुभाष तांगडे, श्याम वीर, भीमराव घोडेराव, भास्कर जावळे, नवनाथ डोळस, डॉ. विठ्ठल डोंगरे, देविदास सपकाळ, दीपक जावळे, बाबा वाघमारे, सुशील जावळे, के. के. कांबळे, रवी डोंगरे, उमेश लोणके, आदेश जावळे, अरविंद जावळे, महापाल जावळे, दया जावळे, रतन जावळे, समाधान जावळे, अ‍ॅड. सुरेश डोंगरे, अंकुश तांगडे, भानुदास जावळे, भागवत शिंदे यांच्यासह शेकडो महिला-पुरुष व रिपाइं कार्यकर्ते उपस्थित होते. शामल हरिभाऊ पवार यांची मुंबई पोलिसांत निवड झाल्याबद्दल पप्पू कागदे यांच्या हस्ते तिचा व तिच्या कुटुंबाचा भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.

COMMENTS