Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हर्नियाचे प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त : डॉ. दिनेश जोशी

शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे व्याख्यान कार्यक्रम

नाशिक : हर्निया ही एक समस्या आहे ज्यामध्ये पोटाचे स्नायू सदोष होतात.  हर्निया सामान्यत: ओटीपोटात असतो. मात्र मांडीच्या वरच्या भागात, नाभी आणि कमर

वाघाचे कातडे विकणार्‍या तिघांना मुंबईत अटक
राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची भेट
रोटरी क्लब शेवगाव आयोजित सूर नवा ध्यास नवा दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न

नाशिक : हर्निया ही एक समस्या आहे ज्यामध्ये पोटाचे स्नायू सदोष होतात.  हर्निया सामान्यत: ओटीपोटात असतो. मात्र मांडीच्या वरच्या भागात, नाभी आणि कमरेच्या आसपासदेखील होतो. हर्नियामध्ये पोटाचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. हा आजार पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही होतो. मात्र पुरुषांवर त्याचा सर्वाधिक परिणाम होत असल्याचे प्रतिपादन नारायणी हॉस्पीटलचे डॉ. दिनेश जोशी यांनी केले.

राजीवनगर येथील शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित व्याख्यान कार्यक्रमाप्रसंगी डॉ. जोशी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष विजय भावे, उपाध्यक्ष वेदु सोनवणे, कार्यवाह सुरेश कांबळे, स्वाती बेलदार उपस्थित होते. डॉ. जोशी म्हणाले की, हर्निया रोगामुळे पोटाचे स्नायू कमकुवत होऊ लागतात आणि या कमकुवततेमुळे आतड्या बाहेर येतात. पुरुषांच्या कमरेच्या भागात हर्निया जास्त होतो. यामुळे आतड्याचा अवरोध होऊ शकतो त्यामुळे अधिक समस्या उद्भवतात. त्यामुळे वेळीच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढील उपचार करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सुरुवातीला संघाचे अध्यक्ष विजय भावे यांनी संघातर्फे राबविण्यात येणार्‍या कार्याची माहिती उपस्थितांना दिली

COMMENTS