बीड : देवगिरी प्रतिष्ठान संचलित, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, बीड येथे ‘नारी शक्ती कौशल्य अभियान व जागरूकता सत्र’ गुरुवार दि.16 रोजी उत्साहात पार

बीड : देवगिरी प्रतिष्ठान संचलित, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, बीड येथे ‘नारी शक्ती कौशल्य अभियान व जागरूकता सत्र’ गुरुवार दि.16 रोजी उत्साहात पार पडले. महिलांना त्यांचे घटनात्मक अधिकार आणि करिअरच्या संधींबाबत जागरूक करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध विधीज्ञ ड.आदर्श जाधव उपस्थित होते. तर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुलसी शैक्षणिक समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे हे होते. यावेळी प्राचार्या डॉ.अश्विनी बेद्रे, उपप्राचार्या सय्यद शहाना लियाकत अली, आयक्यूएसी समन्वयक डॉ. सुलेखा डोले, विभागप्रमुख सौ. विद्या आवघाडे व एचआर सौ. स्वरूपा कैवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक ड.आदर्श जाधव यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना महिला सक्षमीकरणाच्या विविध कायदेशीर पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांचे संविधानिक अधिकार, कायदेशीर संरक्षण तसेच राजकीय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. यासोबतच ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ महिला आरक्षण विधेयक या ऐतिहासिक निर्णयाचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून दिले. महिलांचे आरोग्य, शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि कौशल्य विकास यातील संधी व आव्हानांवरही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्रा.प्रदीप रोडे यांनी महिला सक्षमीकरणासाठी सामाजिक जाणीव आणि सक्रिय सहभागाची गरज अधोरेखित केली. प्राचार्या डॉ. अश्विनी बेद्रे यांनी विद्यार्थिनींना अशा उपक्रमांतून मिळणारे ज्ञान प्रत्यक्ष जीवनात वापरण्याचे आवाहन केले. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेकडून अशा कार्यक्रमांचे आयोजन पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सत्रात विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वृषाली मॅडम यांनी मानले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राद्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS