Homeताज्या बातम्या

पुणे-नाशिक महामार्गावर कंटेनर डिव्हायडर तोडून ट्रकला धडकला; खेड तालुक्यातील वाकीजवळील घटना

https://www.youtube.com/watch?v=lHXKRqz3Fto पुणे-नाशिक महामार्गावरून एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. खेड तालुक्यातील वाकीजवळ आज

समृद्धीवरील अपघातात माजी रणजीपटूचा अपघात
दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात दाम्पत्यासह नदीत कोसळली कार.
पुणे-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात .

पुणे-नाशिक महामार्गावरून एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. खेड तालुक्यातील वाकीजवळ आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास कंटेनर आणि ट्रकचा अंगावर काटा आणणारा अपघात झाला आहे.
नाशिकच्या बाजूने येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने महामार्गाचा डिव्हायडर तोडला आणि तो थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रक खाली कोसळला आणि त्याखाली एक कार दबली गेली. अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

COMMENTS