Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डक दाम्पत्याच्या भाजपप्रवेशाचा गाजावाजा नेमका कुणासाठी?महायुतीत नवा संघर्ष पेटणार? नांदेड उत्तरवर भाजपची पुन्हा नजर

नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात आगामी राजकीय समीकरणांची चाहूल देणारी हालचाल सुरू झाली असून, अपक्ष निवडणूक लढविणार्‍या सौ. संगीता विठ्ठल

‘महायुतीत बॉस कोण’ फडणवीसांनी गेम कसा फिरवला शिंदेंची प्रतिष्ठा आणि दिल्लीत लागलेला ब्रेक
विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला! विधानपरिषदेसाठी भाजपची ‘११ शिलेदारांची’ घोषणा । लोकमंथन News२४


नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात आगामी राजकीय समीकरणांची चाहूल देणारी हालचाल सुरू झाली असून, अपक्ष निवडणूक लढविणार्‍या सौ. संगीता विठ्ठल पाटील डक आणि त्यांचे पती विठ्ठल पाटील डक यांच्या भाजपप्रवेशाचा अचानक मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला गाजावाजा आता राजकीय वर्तुळात संशय आणि चर्चेचा विषय ठरत आहे. शहरभर झळकणारे बॅनर, स्वागताचे संदेश आणि पक्षीय कार्यकर्त्यांना दिले गेलेले कथित आदेश यामुळे हा केवळ प्रवेश सोहळा नसून भविष्यातील मोठ्या राजकीय डावपेचांची नांदी असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, नांदेड उत्तरमध्ये शिवसेनेच्या विद्यमान आमदारांविरोधात अपक्ष उमेदवारी करून निवडणूक लढविणार्‍या व्यक्तींनाच आता भाजपकडून नव्याने राजकीय बळ दिले जात असल्याने महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना आणि भाजप यांच्यात वरवर मैत्रीचे वातावरण असले तरी स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षांमध्ये अविश्वास आणि वर्चस्वाची लढाई कायम असल्याचे या घडामोडींमधून स्पष्ट होत आहे. शहरातील अनेक भागांत लावण्यात आलेल्या बॅनरबाजीमुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपच्या विद्यमान तसेच पराभूत नगरसेवकांना शिवाजीनगर भागातून बॅनर लावण्याचे आदेश देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ स्वागतापुरता मर्यादित नसून, ‘शक्तीप्रदर्शन’ म्हणून आखला गेला असल्याचे मानले जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, नांदेड उत्तर मतदारसंघावर पुन्हा दावा मजबूत करण्यासाठी भाजपने ही चाचपणी सुरू केली आहे. मागील काही वर्षांत शिवसेनेने या मतदारसंघात आपले अस्तित्व घट्ट केले असले तरी भाजपने अद्याप हा मतदारसंघ पूर्णपणे सोडलेला नाही. त्यामुळे डक दाम्पत्याच्या माध्यमातून नव्या समीकरणांची बीजे पेरण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. महायुतीत जागावाटपाचा प्रश्न भविष्यात पुन्हा तापू शकतो, याचीही ही प्राथमिक चाहूल मानली जात आहे. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांमध्ये या घडामोडींमुळे अस्वस्थता वाढल्याचे समजते. ज्यांनी आमच्या अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली, त्यांनाच आता सन्मानाने प्रवेश देऊन पुढे आणले जात असेल, तर यामागे नेमका संदेश काय? असा सवाल शिवसैनिकांमध्ये खासगीत उपस्थित केला जात आहे. दरम्यान, भाजपकडून मात्र या प्रवेशाला सामान्य कार्यकर्त्यांचा पक्षावर वाढता विश्वास असे स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु शहरातील राजकीय निरीक्षकांच्या मते, एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करून करण्यात आलेला हा प्रवेश भविष्यातील विधानसभा रणनितीचा भाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. नांदेड उत्तरमध्ये आगामी काळात शिवसेना-भाजप संघर्ष अधिक तीव्र होणार का? भाजप या मतदारसंघावर पुन्हा दावा ठोकण्याच्या तयारीत आहे का? आणि डक दाम्पत्य हा त्या मोठ्या राजकीय समीकरणातील केवळ प्रारंभिक चेहरा आहे का? या प्रश्नांची उत्तरे पुढील काही महिन्यांत स्पष्ट होणार असली तरी सध्या मात्र या भाजपप्रवेशाने नांदेडच्या राजकारणात नव्या चर्चांना जोर चढला आहे.

COMMENTS