Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापुरात वीज मोटारीच्या केबल चोरणारे चोरटे पकडले

बेलापूर प्रतिनिधी : बेलापूर व परिसरात शेतकर्‍यांच्या शेतातील वीज मोटारीच्या केबल चोरुन त्यातील तांब्याची तार विकणारे दोन व तार विकत घेणारा असे ती

चितपट कुस्त्यांना मिळाली टाळ्या-शिट्ट्यांची दाद
सर्वच क्षेत्रात तरबेज असणे गरजेचे ः चैतालीताई काळे
सिव्हील हॉस्पिटल आगप्रकरणी अखेर डॉ. पोखरणाला अटक

बेलापूर प्रतिनिधी : बेलापूर व परिसरात शेतकर्‍यांच्या शेतातील वीज मोटारीच्या केबल चोरुन त्यातील तांब्याची तार विकणारे दोन व तार विकत घेणारा असे तीन आरोपी पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. श्रीरामपूर तालुका तालुक्यातील एकलहरे शिवारातील एकलहरे-टिळकनगर रस्त्यांच्या कडेला शेती महामंडळाच्या शेतात भल्या सकाळी केबल चोरट्यांना येथील शेतकर्‍यानी केबल जाळतांना रंगेहाथ पकडले. मात्र चोरट्यांनी सदर शेतकर्‍याला दमदाटी देत घटनास्थळावरून पोबारा केला या बाबतची माहिती बेलापूर पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली पोलिसांनी गणेश संतोष आल्हाट यास ताब्यात घेतले. त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आदित्य नामदेव आहेर राहणार वडजळी भोकर याचे नाव सांगितले.

पोलीसांनी तातडीने आरोपी आहेर याची माहिती घेवुन त्यास शिताफीने अटक केली. तसेच आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर असून एक इसम संशयीत म्हणून ताब्यात घेतला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे. तसेच चोरीची तांब्याची तार विकत घेणारा मुस्ताक याकुब शेख यास देखील ताब्यात घेतले असून न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी भल्या सकाळी टिळकनगर-एकलहरे रस्त्याच्या महामंडळाच्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात काळकुट धूर निघत होता, एकलहरे येथील शेतकरी सदर रस्त्याने आपल्या शेतांत मोटार चालू करण्यासाठी जात असतांना सदर बाब शेतकर्‍याच्या निदर्शनास आली. शेतकर्‍याने घटनास्थळी जाऊन बघितले असता,सदर चोरटे लंपास केलेल्या केबली जाळून नष्ट करत त्यामधून कॉपर तार काढून विक्री करण्यासाठी तयार करत होते. सदर शेतकर्‍यानी चोरट्यांना याबाबत हटकले असता, चोरट्यांनी सदर शेतकर्‍याला दमदाटी करत घटनास्थळावरून धूम ठोकली सदर शेतकर्‍यानी लगेचच बेलापूर पोलिसांना याबाबद माहिती देताच बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड सहाय्यक फौजदार सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब कोळपे पोलीस काँन्स्टेबल संपत बडे भारत तमनर नंदकिशोर लोखंडे ज्ञानेश्‍वर वाघमोडे यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून आरोपी बाबत माहीती घेतली  पोलीसांनी संशयावरुनआगोदर अल्हाट यास ताब्यात घेतले नंतर आहेर यास ताब्यात घेतले असुन पोलिसांना सदर जागेवरून वीस ते तीस किलो कॉपर तारेचा साठा जाळलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. एकलहरे ,उक्कलगाव, बेलापूर शिवारातील सातत्याने शेतकर्‍यांचे वीजपंप व केबल चोरीचे प्रकार समोर आले. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे., सदर आरोपीकडून सखोल तपास केल्यास या ताब्याच्या तारा स्वस्तात विकत घेणारा मोठा मासा गळाला लागु शकतो काल सदर घटनेने एकलहरे, बेलापूर, उक्कलगाव येथील शेकडो शेतकर्‍यांनी बेलापूर पोलीस ठाण्यात धाव घेत आपापल्या चोरीला गेलेल्या मोटारी, केबल सह अन्य वस्तु बाबत तक्रार दिल्या आहेत.

एकलहरे, बेलापूर, उक्कलगाव क्षेत्राच्या परिसरातील शेतकर्‍यांसाठी रात्र वैर्‍याची ठरत आहे.येथील शेतकर्‍यांचे विद्युत पंप, केबल, स्टार्टरवर चोरटे डल्ला मारीत आहेत. यामुळे रात्री सुरू असलेला पंप सकाळी शाबूत असण्याची खात्री नाही. आमचा हजारोंचा वीजपंप व केबल चोरट्यांनी चोरून नेला आहे. उन्हाची वाढती तीव्रता, पिकांची पाण्याची गरज भागविताना होणारी दमछाक व चोरीची घटना यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोर चोरी करीत आहेत.पोलिसांनी गस्त वाढविण्याबरोबर चोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे बनले आहे.
सचिन थोरात, शेतकरी, उक्कलगाव

COMMENTS