सांगली : महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींमध्ये लोकप्रिय असलेले महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान सिकंदर शेख यांच्या वाहनाचा सांगली जिल्ह्यात अपघात झाल्य

सांगली : महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींमध्ये लोकप्रिय असलेले महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान सिकंदर शेख यांच्या वाहनाचा सांगली जिल्ह्यात अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी परिसरात रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या घटनेमुळे कुस्ती क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर शेख यांच्या वापरातील चारचाकी वाहन राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील दुभाजकाला जोरदार धडकले. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की वाहनाच्या पुढील भागाचे गंभीर नुकसान झाले. अपघातानंतरचे छायाचित्रेही समोर आली असून त्यामध्ये वाहनाची झालेली हानी स्पष्ट दिसून येते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चालकाला डुलकी लागली होती का, वाहनात काही तांत्रिक बिघाड झाला होता का किंवा अन्य कोणते कारण होते, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संबंधित यंत्रणा घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, अपघाताच्या वेळी स्वतः सिकंदर शेख वाहनात उपस्थित होते की नाही, याबाबतही अद्याप निश्चित माहिती उपलब्ध झालेली नाही.

COMMENTS