Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

योग्य काळजी, नियमित तपासणीतून नेत्र विकार ठेवा दूर

डॉ. शरद पाटील : लोकज्योती मंचच्या वर्धापनदिनी कार्यक्षम संघ पुरस्कार वितरण

नाशिक : वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळ्या स्वरूपाचे नेत्र विकार उद्भवत असतात. टीव्ही, मोबाईलमुळे वाढलेला स्क्रीन टाइमसह अन्य विविध कारणांनी नेत्रविका

ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूने पटकावले कांस्यपदक
आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्यांवर कारवाई
Do Not Touch My Clothes’ अफगाणी महिला असं का म्हणत आहेत?

नाशिक : वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळ्या स्वरूपाचे नेत्र विकार उद्भवत असतात. टीव्ही, मोबाईलमुळे वाढलेला स्क्रीन टाइमसह अन्य विविध कारणांनी नेत्रविकार होऊ शकतात. काचबिंदू केलेल्या दुर्लक्षामुळे अंधत्व येऊ शकते. योग्य काळजी घेतांना व दर वर्षी किमान एकदा तपासणी करून घेत नेत्रविकारांपासून बचाव करावा असे प्रतिपादन सुशिल आय केअर संचलित डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलचे संचालक ज्येष्ठ नेत्र विकार तज्ञ डॉ.शरद पाटील यांनी गुरुवारी (29 जून) केले.

लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचचा वर्धापनदिन सोहळा परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महापालिका माजी सभागृह नेते दिनकर पाटील, जगदीश पाटील, सत्यनारायण चौधरी, मंचचे अध्यक्ष रंजनभाई शाह, रमेश डहाळे, जितेंद्र येवले, देवराम सैंदाणे, भा.रा.सुर्यवंशी, वैशाली पिंगळे, कुमुदिनी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

डॉ. शरद पाटील पुढे म्हणाले, माणसाचे डोळे हे कुठल्याही कॅमेऱ्यापेक्षा अधिक प्रभावी असतात. डोळ्यांच्या विकारातून मधुमेह, उच्च रक्तदाब यासह अन्य विविध आजारांचे निदान होऊ शकते. त्यामुळे नित्याने नेत्र तपासणी करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाने उपचार पद्धती अधिक सुलभ केलेली असून रुग्णांना कमीत कमी त्रासात दर्जेदार उपचार करणे शक्य झालेली आहे. यावेळी त्यांनी सादरीकरणातून मोतीबिंदू, काचबिंदू यासह अन्य विविध आजारांची माहिती दिली. वाढत्या वयासोबत डोळ्यांचे स्नायू कमकुवत होत असल्याने अशा डोळ्यांची काय काळजी घ्यावी, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.

दिनकर पाटील म्हणाले, ज्येष्ठ नागरिक हे समाजाची संपत्ती आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेत सामाजिक विकास साधता येऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक, व त्यांच्या साठी कार्य करणाऱ्या संघांना नेहेमी सहकार्य केले असून या पुढील काळात देखील असेच सहकार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या संघांना ‘कार्यक्षम ज्येष्ठ नागरिक संघ’ पुरस्कार प्रदान – कार्यक्रमात कार्यक्षम ज्येष्ठ नागरिक संघ’ पुरस्कार प्रदान केले. यामध्ये जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघ (ओझर), ज्येष्ठ नागरिक संस्था मालेगाव कॅम्प व परिसर (मालेगाव) आणि भारतनगर ज्येष्ठ नागरिक संघ (नाशिक) या संघांचा समावेश होता. यावेळी प्रथमच ग्रामीण भागातील संघांना पुरस्कार दिला जात असल्याची माहिती रमेश डहाळे यांनी प्रास्ताविकात दिली.

भजनांनी केले मंत्रमुग्ध – आषाढी एकादशी निमित्त भजन संध्या हा कार्यक्रम देखील पार पडला. ओम भजनी मंडळतर्फे मिनाक्षी मेतकर व सहकारी आणि राधाकृष्ण भजनी मंडळतर्फे  उज्वला वाणी व सहकारी यांनी भजन सादर केले. बाळकृष्ण दंडगांवकर, डी.एम.कुलकर्णी, कमला पणेर,प्रकाश महाजन, बापू अमृतकार, सविता चतूर, हरिश्चंद्र निंबाळकर, वसंतराव पुंड आदी उपस्थित होते.

COMMENTS