Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; आंतरजिल्हा वाहन चोरट्यांची टोळी जेरबंद, दोन आरोपी अटकेत

बीड : जिल्ह्यासह शेजारील भागात चारचाकी वाहने चोरणार्‍या आंतरजिल्हा टोळीचा बीड स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत द

डी-मार्ट तिहेरी हत्याकांडाचा तपास वेगात; आश्रयदात्यांवरही पोलिसांनी फास आवळला;आणखी 2 आरोपी जेरबंद; मुख्य सूत्रधार साई लाला अद्याप फरार
जन्म दाखल्यासाठी ३ हजारांची लाच; जामखेड नगरपरिषदमधील घटना; दोघांना तीन दिवसांची कोठडी
दिंडोरीत ACB ची मोठी कारवाई! वेतनश्रेणीच्या बिलासाठी लाचेची मागणी!

बीड : जिल्ह्यासह शेजारील भागात चारचाकी वाहने चोरणार्‍या आंतरजिल्हा टोळीचा बीड स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चोरीचा टेम्पोसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती अशी की, दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी पेठबीड येथील रहिवासी अश्पाक अनिमोद्दीन मोमीन यांचा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो बार्शी नाका परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी पेठबीड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने संशयितांची माहिती मिळवण्यात आली. या तपासादरम्यान आरोपी लातूर जिल्ह्यात लपून बसल्याची खात्री पटताच पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने लातूर शहरात सापळा रचून संशयितांचा माग काढत शिताफीने दोन आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे तैबाज सलीम शेख (वय 25, रा. म्हाडा कॉलनी, लातूर) आणि रेहान इलाही शेख (वय 19, रा. चांदनगर, लातूर) अशी आहेत. चौकशीदरम्यान आरोपींनी पेठबीड येथून टेम्पो चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला टेम्पो जप्त केला आहे. तसेच अधिक तपासात या आरोपींनी लातूर येथील विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक पिकअप वाहन चोरल्याचेही उघड केले आहे. यामुळे या टोळीने अनेक ठिकाणी वाहन चोरी केल्याची शक्यता असून पोलीस त्यादृष्टीने सखोल तपास करत आहेत. अटक आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी पेठबीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोउपनि श्रीराम खटावकर, मारुती कांबळे, बाळू सानप, सोमनाथ गायकवाड, युनुस बागवान, अश्पाक सय्यद, मनोज परजणे, आश्विन सुरवसे आणि चालक अतुल हराळे यांचा सहभाग होता.  दरम्यान, वाहन मालकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करणे, सीसीटीव्ही व सुरक्षा साधनांचा वापर करणे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

COMMENTS