मुंबई : जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय अनिश्चिततेचा परिणाम देशातील सराफा बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. शनिवारी सोने आणि चांदीच्या दरात सौम्य व

मुंबई : जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय अनिश्चिततेचा परिणाम देशातील सराफा बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. शनिवारी सोने आणि चांदीच्या दरात सौम्य वाढ नोंदवली गेली असून, मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदार अधिक सावध झाले आहेत. पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणार्या सोन्या-चांदीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसत आहे.
मागील व्यवहार सत्रात देशातील वायदे बाजारातही मौल्यवान धातूंना चांगलीच मागणी मिळाली. सोने आणि चांदी दोन्ही तेजीत बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही किमतींमध्ये किरकोळ वाढ दिसून आली. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम धातूंच्या दरांवर होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, चांदीच्या दरात सुमारे 1.38 टक्क्यांची वाढ होऊन ती सुमारे 2,44,845 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. सोनेही जवळपास 0.70 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये वाढ दिसून येत आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्ये 10 ग्रॅम चांदीचा दर सुमारे 2,600 रुपये आहे, तर 100 ग्रॅमसाठी 26,000 रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये हा दर थोडा अधिक असून 10 ग्रॅमसाठी सुमारे 2,700 रुपये आहे. तर सोन्याचा दरांचा विचार करता नवी दिल्लीत 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,54,190 रुपये, तर 22 कॅरेटचे दर 1,41,350 रुपये आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरच्या तुलनेतील बदल आणि भू-राजकीय तणाव यांचा सोन्या-चांदीच्या किमतींवर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे गुंतवणूक करताना बाजारातील स्थितीचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.

COMMENTS