Homeताज्या बातम्या

घर कोसळून महिलेचा मृत्यू ; पाच जखमी

 पाथर्डी : तालुक्यातील कडगाव येथे शुक्रवारी (दि. 5 जून) रात्री झालेल्या वादळी पाऊस व जोरदार वार्‍यामुळे घराची पडझड होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्

 कोपरगाव तहसीलमध्ये आज आ. काळेंचा जनता दरबार  
विकासकामांमध्ये राजकारण नव्हे जनहिताला प्राधान्यआ. रोहित पवार ; बसस्थानक, जिल्हा उपरुग्णालय, व्यापारी संकुलासह विविध कामांचा आढावा
कोपरगावचे महिला समुपदेशन केंद्र बंद होण्याच्या मार्गावरडॉ. गावित्रे ; महिलांच्या समस्या सोडविणाऱ्या केंद्रास अद्याप पर्यायी जागा नाही
Stormy winds : वादळी वाऱ्याचा तडाखा; कडगाव येथे घर कोसळून महिलेचा मृत्यू | I Love Nagar | News Portal


 
पाथर्डी : तालुक्यातील कडगाव येथे शुक्रवारी (दि. 5 जून) रात्री झालेल्या वादळी पाऊस व जोरदार वार्‍यामुळे घराची पडझड होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत कुटुंबातील पाच ते सहा जण जखमी झाले असून घरासह संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कडगाव येथील शेतकरी विलास किसन शिरसाट यांच्या घरातील सर्व सदस्य पडवीत झोपले होते. त्याचवेळी अचानक आलेल्या सुसाट वार्‍याने घरावरील पत्रे उडून गेली. तसेच पत्र्यावरील भिंत कोसळल्याने पडवीत झोपलेल्या कुटुंबीयांवर ढिगारा पडला.
या घटनेत घरावरील पत्र्याचा जबर मार समाबाई विलास शिरसाट यांना लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत विलास शिरसाट, सागर शिरसाट, विराज शिरसाट, अलका शिरसाट यांच्यासह अन्य काही कुटुंबीय जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
वादळी वार्‍यामुळे घराची पूर्ण पडझड झाली असून अनेक पत्रे वार्‍याने उडून घरासमोर पडली. घरातील संसारोपयोगी साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे शिरसाट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. पंचनामा व मदतकार्याची प्रक्रिया सुरू असून प्रशासनाने नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

COMMENTS