Homeताज्या बातम्या

अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी  मेडिकल चालकास अटक

अहिल्यानगर : लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अवैध गर्भलिंग निदान चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील आणखी एका मेडिकल चालकास पोलिसांनी अटक केली

जबरी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
देवळाली प्रवरात जादूटोण्याचा संशयघरातील वस्तू अचानक पेटल्याने खळबळ
बिनधास्त येथे होते पंचवीस हजारांत गर्भलिंग निदान...

अहिल्यानगर : लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अवैध गर्भलिंग निदान चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील आणखी एका मेडिकल चालकास पोलिसांनी अटक केली आहे.आतापर्यंत 6 डॉक्टरांसह 19 आरोपी जेरबंद करण्यात आले असून यात पाच सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आल्या आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील जालिंदर रामदास बोरुडे (वय 40) असे ताब्यात घेतलेल्या मेडिकल चालकाचे नाव असून त्यांच्याकडून सोनोग्राफी मशीन आणि क्रेटा चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणात सुरुवातीला नेवासा येथील डॉ.भणगे, दोन एजंट आणि सहा कुटुंबीय अशा एकूण 9 जणांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि तीन चारचाकी वाहने जप्त केली होती. त्यानंतरच्या तपासात ढगे नामक आरोपीकडून आणखी एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले तसेच अनेक एजंटांनाही अटक करण्यात आली. तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी श्रीरामपूर येथील डॉ. कुटे आणि डॉ. शेख यांनाही लिंगनिदान चाचणी व अवैध गर्भपात प्रकरणात अटक केली. पुढील तपासात पुणे येथील दोन डॉक्टर आणि वैद्यकीय साहित्य विक्री करणार्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. तसेच वडगाव मावळ येथील मारुती ढोरे यालाही आरोपी करून त्याच्याकडून अवैध लिंगनिदानासाठी वापरण्यात येणारे मशीन जप्त करण्यात आले.
 तपासादरम्यान पुण्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील डॉ.कुणाल वलटे याने बेकायदेशीररित्या सोनोग्राफी मशीन खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने डॉ. वलटे आणि स्थानिक मेडिकल चालक सागर उन्हाळ यांना अटक केली.  

COMMENTS