Homeताज्या बातम्यादेश

नरसापुर अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्येच्या निषेधात बीडमध्ये ; राष्ट्रवादी महिला आघाडीचे धरणे आंदोलन

दि. 1 मे 2026 रोजी  नरसापुर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येच्या तीव्र निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवा

कैलास महाराज आनंदे हल्ला प्रकरणी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनद्वारे साधला संवादकैलास महाराजांना 1 लाख रुपयांची मदत, न्याय देण्याचे दिले आश्वासनसाधुसंतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, शिवसेनेची ठाम भूमिका
गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन
गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित कराकत्तलखाने व मांस निर्यात बंदीच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने



दि. 1 मे 2026 रोजी  नरसापुर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येच्या तीव्र निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार पक्ष) महिला आघाडी, बीड जिल्ह्याच्या वतीने आज (11 मे 2026) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले . या आंदोलनासाठी शहर पोलीस स्टेशनला परवानगीसाठी पत्र दिले असून, अंदाजे 150 महिला कार्यकर्त्या सहभागी झाले होते.
जिल्हाध्यक्षा श्रीमती. नसरीन बागवान यांनी पोलिस निरीक्षकांना दिलेल्या पत्रात या घटनेची कठोर निंदा करत सासवड प्रकरणातील (मौजे नरसापुर) आरोपींना तात्काळ अटक, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला आणि फाशीची शिक्षा, पीडित कुटुंबाला 50 लाखांची मदत व शासकीय नोकरी, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदा तसेच महिला सुरक्षा पथके व सीसीटीव्ही वाढवण्याच्या प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आंदोलन शांततेने होईल व कायदा-सुव्यवस्था बाधित होणार नाही, असे  पत्रात नमूद केले. पत्राची प्रत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे. या आंदोलनात राणीताई गुल, इनामदार तसलीम, उन्नता खंडागळे, आश्विनी सोळंके, तमन्ना शेख, शर्मीम शेख आदी प्रमुख कार्यकर्त्या सहभागी नोंदविला.

COMMENTS