Homeताज्या बातम्या

“आमचा एकही आमदार फुटणार नाही!” – खासदार शरद पवारांचा बारामतीत ठाम विश्वास

बारामती: राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना विविध पक्षांतील संभाव्य बंडखोरी आणि पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी

कुंडलवाडीच्या भूमिपुत्राची मोठी झेप; सुदर्शन होनवडजकर मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त
नसरापूर अत्याचार आणि हत्या खटल्यात ६५ वर्षीय आरोपी दोषी; अंतिम शिक्षेचा निर्णय २९ जूनला
विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज कशासाठी?
शरद पवार बोले- मुसलमानों को नहीं मिल रहा उचित हिस्सा, ऊर्दू की भी की  तरफदारी Sharad Pawar says muslims not getting their fair share being a  major part of population - India

बारामती: राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना विविध पक्षांतील संभाव्य बंडखोरी आणि पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातही फूट पडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, या सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी, “आमचा एकही आमदार कुठेही जाणार नाही,” असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

शरद पवार हे बारामती दौऱ्यावर असताना विद्या प्रतिष्ठान संकुलातील एका कार्यक्रमासाठी जात होते. याप्रसंगी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना सद्यस्थितीतील राजकीय परिस्थितीबाबत प्रश्न विचारला. ठाकरे गटातील घडामोडींनंतर राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांमध्येही पक्षांतर होणार असल्याच्या चर्चांबाबत त्यांना विचारण्यात आले. यावर शरद पवार यांनी कोणताही संभ्रम न ठेवता, पक्षातील सर्व लोकप्रतिनिधी एकजुटीने कार्यरत असल्याचे सांगितले. पक्षात कोणतीही फूट पडणार नसल्याचा विश्वास त्यांनी या वेळी पुनरुच्चारला.

COMMENTS