शेवगाव : हिंदू, बौद्ध व शीख धर्मातील व्यक्तीने धर्मांतर केल्यास अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम को

शेवगाव : हिंदू, बौद्ध व शीख धर्मातील व्यक्तीने धर्मांतर केल्यास अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे माजी शहराध्यक्ष सोमनाथ मोहिते यांनी स्वागत करत, तो सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना बळ देणारा असल्याचे म्हटले आहे.
मोहिते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, भारतातील आरक्षण व्यवस्था ही ऐतिहासिक व सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांना न्याय मिळावा, या उद्देशाने भारतीय संविधानात तरतूद करण्यात आली आहे. संविधानातील कलम १४ नुसार सर्व नागरिकांना कायद्यापुढे समानता देण्यात आली असून, कलम १५(४) व १६(४) अंतर्गत मागास घटकांच्या उन्नतीसाठी राज्याला विशेष उपाययोजना करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
अनुसूचित जातींची यादी निश्चित करण्यासाठी ‘संविधान (अनुसूचित जाती) आदेश १९५०’ लागू करण्यात आला. सुरुवातीला हा दर्जा हिंदू समाजातील घटकांना देण्यात आला होता. पुढे बौद्ध व शीख धर्मीयांनाही त्यात समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे इतर धर्म स्वीकारल्यानंतर अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ लागू होत नाही, ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अधिक स्पष्ट झाली आहे.
धर्मांतरानंतर आरक्षणाचा लाभ मिळावा का, यावर देशभरात अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती. न्यायालयाचा हा निर्णय आरक्षण व्यवस्थेच्या मूळ उद्देशाचे संरक्षण करणारा असून सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना अधिक दृढ करणारा असल्याचे मोहिते यांनी नमूद केले.

COMMENTS