Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सद्गुरू कृषी महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात 

कर्जत : मिरजगाव येथील संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल

गौतम पॉलिटेक्निकमध्ये रोबो विश्व रोबोटिक्स क्लबचे उद्घाटन
आंबीजळगावात मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन घरांवर दरोडा, ५८ हजारांचा ऐवज लंपास
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने गौरव

कर्जत : मिरजगाव येथील संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “अंतर्नाद” या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. कला, संस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला. महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी (दि. १४) हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. 

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत येथील डी.वाय.एस.पी. प्रवीण लोखंडे व मिरजगाव येथील ए.पी.आय. विजय झंजाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉ. शंकरराव नेवसे होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. कल्याणीताई नेवसे, संचालक सिद्धांत नेवसे, संचालिका प्रतीक्षा नेवसे, संस्थेच्या खजिनदार अर्चनाताई गोरे, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे, समन्वयक राहुल म्हेत्रे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सचिन आढाव तसेच सर्व प्राध्यापकवर्ग उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे डी.वाय.एस.पी. प्रवीण लोखंडे व ए.पी.आय. विजय झंजाड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना “शिस्त आणि कला यांचा समन्वय साधत जीवनात प्रगती साधा,” असा संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात डॉ. शंकरराव नेवसे यांनी विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले व “शिस्तबद्ध पद्धतीने तुमच्यातील कलाकार जागवा,” असे आवाहन केले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी रोख बक्षिसे देऊन गौरविले.

सुमारे साडेतीन तास चाललेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक गीत, नृत्य, नाट्यप्रयोग आणि विविध कलाप्रकारांनी उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. रामदास बिटे यांनी महाविद्यालयाचा आतापर्यंतचा प्रवास मांडत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. आभार प्रदर्शन प्राध्यापिका पूजा इनामके यांनी केले.

COMMENTS