Homeताज्या बातम्या

बीडच्या नितीन सोनवणे यांना शेगाव येथे राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार 2026 जाहीर

बीड : सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि वंचित-पीडित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा

परळीतील तौहीद पठाण हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा; खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी, पीडित कुटुंबाची घेतली भेट
विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाची गरज ओळखून आधुनिक शिक्षणाचा स्वीकार करावा; प्राचार्य यशवंत भोसले यांचे आवाहन
केज-बीड राज्यमहामार्गावर भीषण अपघात; खासगी ट्रॅव्हल्सला कंटेनरची जोराची धडक, एचपीएम कंपनीच्या गतिरोधकांमुळे मोठा अनर्थ टळला तरी प्रवासी जखमी


बीड : सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि वंचित-पीडित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांना राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आला आहे. हा सन्मान संकल्प बहुउद्देशीय संस्था, शेगाव यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
ऑल इंडिया पँथर सेना चे सक्रिय पदाधिकारी म्हणून नितीन सोनवणे यांनी बीड जिल्ह्यात सामाजिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेत अनेक आंदोलने, निवेदने आणि जनजागृती उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन या वर्षी त्यांची या प्रतिष्ठित राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार संकल्प बहुउद्देशीय संस्था या संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तींना प्रदान केला जातो. यामध्ये विशेषतः समाजहितासाठी सातत्याने कार्य करणारे कार्यकर्ते, संघटनात्मक नेतृत्व करणारे व्यक्ती आणि सामाजिक न्यायासाठी लढणार्‍या घटकांचा सन्मान करण्यात येतो. नितीन सोनवणे यांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा, तसेच शिक्षण, रोजगार आणि सामाजिक न्यायाशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेतली आहे. बीड जिल्ह्यातील विविध घटनांमध्ये त्यांनी पीडितांच्या बाजूने ठामपणे आवाज उठवला असून प्रशासनाशी सातत्याने संवाद साधत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा मोर्चे, आंदोलने, निवेदने आणि जनआंदोलनांचे आयोजन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या या कार्यामुळे ते जिल्ह्यातील सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय आणि आक्रमक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नितीन सोनवणे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हा सन्मान माझ्या वैयक्तिक कार्याचा नाही, तर सामाजिक न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या सर्व सहकार्‍यांचा आहे. संविधानिक मूल्यांसाठी लढणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला हा सन्मान समर्पित आहे. समाजहितासाठी काम करणे हेच खरे कर्तव्य आहे. त्यांनी संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या आयोजक प्रतीक्षा वासनिक तसेच निवड समितीचे आभार मानले. तसेच सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन करून पुढील काळातही सामाजिक प्रश्नांवर अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पुरस्कार वितरण सोहळा 28 जून रोजी
या पुरस्काराचे वितरण 28 जून रोजी शेगाव येथे करण्यात येणार आहे. या सोहळ्यात राज्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या इतर मान्यवरांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. सोहळ्याला राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते, संघटनांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

COMMENTS