मुंबई महापालिका विजयाचे गणित

Homeताज्या बातम्यासंपादकीय

मुंबई महापालिका विजयाचे गणित

सर्वोच्च न्यायालयाने जरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले असून, यासंदर्भातील सुनावणी पाच आठवडा पुढे ढकलण्य

कर्जबुडवे आणि हिंडेनबर्ग अहवाल
मंदीचे सावट गडद
पुरोगामी चळवळीचा आधारवड

सर्वोच्च न्यायालयाने जरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले असून, यासंदर्भातील सुनावणी पाच आठवडा पुढे ढकलण्यात आली आहे. तरी देखील मुंबईत महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षामध्ये तब्बल 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचे बॉम्ब भाजप आमदार अमित साटम यांनी टाकून खळबळ उडवून दिली आहे. सर्वात मोठा अर्थसंकल्प असणारी मुंबई महापालिका आहे. त्यामुळे मुंबई महापालिका ताब्यात असण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई आणि शिवसेना असे समीकरण होते. मात्र ते समीकरण तुटते की काय, अशी भीती शिवसेनेला वाटतेय. कारण शिवसेनेला शिंदे गटाने मोठे खिंडार पाडल्यामुळे शिवसेना कमकुवत झाली आहे. तर दुसरीकडे शिंदे गट भाजपला जाऊन मिळाल्यामुळे भाजपला बळ मिळाले आहे. त्यामुळे भाजप मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल, यात शंकाच नाही. भाजप हा पक्ष नियोजनबद्धरित्या काम करण्यास प्रसिद्ध आहे. नारायण राणे यांचा भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करून, राणेंना बळ दिले, तर दुसरीकडे शिवसेनेला शह दिला. राणे नेहमीच शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतांना दिसून येत आहे. त्यातच मुंबई महापालिका निवडणुकीची कमान आशिष शेलार या अनुभवी व्यक्तीकडे असणार आहे. त्यांना मुंबई महापालिका विजयाचे गणित चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगर पालिका ओळखली जाते. आगामी काही महिन्यात पालिका निवडणुका आहेत. गेल्या 2 दशकांपासून मुंबई पालिकेवर शिवसेनाची सत्ता आहे. मुंबई महापालिकेत एकूण 24 प्रभाग आहे. 227 जागांसाठी ही निवडणूक होत असते. मुख्यमंत्री शिंदे गटाने यात बदल करत प्रभाग संख्या वाढवली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही प्रभाग संख्येवर स्थगिती दिली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्याच्या खालोखाल भाजप हा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधी शिवसेना भाजपची महापालिकेत युती होती म्हणून तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. महापालिकेत गेल्या दोन दशकांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या 93 तर भाजपच्या 82 जागा आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये जागामध्ये फारसा फरक नाही. शिवसेनेकडे 11 नगरसेवक जास्त असले तरी, राज्यात आता सत्ताबदल झाला आहे. शिवाय शिंदे गटाकडे अनेक नगरसेवकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता सहजपणे मिळवू शकतो. मात्र शिवसेना देखील सहजा-सहजी मुंबई पालिकेची सत्ता भाजपच्या हाती जाऊ देणार नाही. त्यासाठी भाजपला मोठा संघर्ष करावा लागू शकतो. येन-केन प्रकारे मुंबई महापालिका हस्तगत करण्यासाठी भाजप सर्व शक्तीनिशी मैदानात उतरतांना दिसून येत आहे. त्यातच भाजप मनसेला सोबत घेण्याच्या विचाराधीन आहे. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने शांत आणि समन्वयाची भूमिका घेऊन, विकासभिमूख भूमिका घेऊन जनतेपुढे गेल्यास जनता मतदानावेळी विचार करते. मात्र विकासाचे कोणतेही मॉडेल समोर न आणता, विकासकामांतील त्रुटी न दाखवता केवळ शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून मुंबई महापालिका भाजपला कदापी हस्तगत करता येणार नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ’मराठी माणूस’ आणि त्याचे प्रश्‍न हा मुद्दा केंद्रस्थानी असतो. मराठी माणसाची कैवारी म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच मराठी माणूस… हे वर्षानुवर्षाचे समीकरण आहे. ते भाजपला तोडावं लागणार आहे.

COMMENTS