Homeताज्या बातम्या

तलवाडा बस स्थानकावर वाहतूक नियंत्रकाचा ‘लपंडाव’; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

गेवराई आगाराच्या कारभाराबाबत सध्या सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त होत आहे. तलवाडा बस स्थानकावर नियुक्त असलेला वाहतूक नियंत्रक नियमितपणे वेळेवर हजर

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रांजण ठेवले पण पाणीच नाही !पुष्पहार घालून, श्रीफळ फोडून गांधीगिरीतून प्रशासनाचा निषेध-डॉ.गणेश ढवळे
कोपरगावचे महिला समुपदेशन केंद्र बंद होण्याच्या मार्गावरडॉ. गावित्रे ; महिलांच्या समस्या सोडविणाऱ्या केंद्रास अद्याप पर्यायी जागा नाही
चंदगड तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या समस्या तात्काळ सोडवा-ब्लॅक पँथर



गेवराई आगाराच्या कारभाराबाबत सध्या सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त होत आहे. तलवाडा बस स्थानकावर नियुक्त असलेला वाहतूक नियंत्रक नियमितपणे वेळेवर हजर राहत नसल्याचा आरोप होत असून, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः शाळा सुरू झाल्यानंतर बस पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांची वाढलेली गर्दी लक्षात घेता, संबंधित कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तलवाडा बस स्थानकावरील वाहतूक नियंत्रकाची अधिकृत कामाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 अशी आहे. मात्र, संबंधित कर्मचारी सकाळी 11 वाजल्यानंतरच कार्यालयात येत असल्याचा आरोप आहे. तसेच दुपारी 3 ते 3.30 वाजेच्या सुमारास कार्यालय सोडून जात असल्याने या काळात बस पास काढण्यासाठी किंवा इतर चौकशीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. शाळेच्या वेळा आणि पास काढण्यासाठीची प्रक्रिया यांचा ताळमेळ बसत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना वर्ग बुडवावे लागत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
कामाच्या वेळेत अनुपस्थित राहूनही संबंधित कर्मचारी पूर्ण दिवसाचा पगार घेत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकारावर आगार व्यवस्थापनाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत असल्याने गेवराई आगाराच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नियम सर्वांसाठी समान आहेत का? असा सवाल विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून विचारला जात आहे.
कारवाईची मागणी
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने दखल घ्यावी, संबंधित कर्मचार्‍याची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी तसेच तलवाडा बस स्थानकावर जबाबदार आणि वेळेचे पालन करणार्‍या कर्मचार्‍याची नियुक्ती करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटना आणि नागरिकांकडून होत आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

COMMENTS