Homeताज्या बातम्या

संजीवनी विद्यापीठाचा ‘लिंक्डइन लर्निंग’सोबत सामंजस्य करार

कोपरगाव : विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्य, उद्योगाभिमुख ज्ञान आणि रोजगारासाठी आवश्यक आधुनिक कौशल्ये आत्मसात करता यावीत, यासाठी संजीवनी विद्

भूमी सर्वेक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल; प्रशांत गुरुनाथ फोडसे यांना ’महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’
८०० बाल वारकर्‍यांचे नयनरम्य रिंगण, सहावीच्या चिमुकल्यांचे अभ्यासपूर्ण कीर्तन; माइलस्टोन स्कूलच्या मैदानावर अवतरली पंढरी!
भोकर सार्वजनिक अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी वाघमारे; सचिवपदी डोईफोडे

कोपरगाव : विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्य, उद्योगाभिमुख ज्ञान आणि रोजगारासाठी आवश्यक आधुनिक कौशल्ये आत्मसात करता यावीत, यासाठी संजीवनी विद्यापीठाने ‘लिंक्डइन लर्निंग’सोबत सामंजस्य करार केला. या करारामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना १५ हजारांहून अधिक ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध होणार असून, अद्ययावत ज्ञानासह जागतिक स्तरावरील प्रमाणपत्रे मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. संजीवनी विद्यापीठात झालेल्या कराराच्या कार्यक्रमास विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे, रजिस्ट्रार प्रा. अमोल ढाकणे, ऑनलाइन एज्युकेशन अँड डिस्टन्स लर्निंग स्कूलचे अधिष्ठाता डॉ. विनोद मालकर, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या अधिष्ठाता डॉ. कविथा राणी तसेच लिंक्डइन लर्निंगचे अमित मुखर्जी, शिवप्रसाद लोंगानी आणि अनूप मेनन उपस्थित होते. या करारामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उद्योगक्षेत्राच्या गरजा यांतील दरी कमी होण्यास मदत होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, डिजिटल मार्केटिंग, बिझनेस ॲनालिटिक्स, नेतृत्व विकास, संवादकौशल्य, प्रकल्प व्यवस्थापन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वित्त, उद्योजकता यांसह विविध उदयोन्मुख क्षेत्रांतील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. लिंक्डइन हे २०० हून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेले व्यावसायिक नेटवर्किंग व्यासपीठ आहे. त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःची व्यावसायिक ओळख निर्माण करण्यास, उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधण्यास, रोजगाराच्या संधी शोधण्यास तसेच कौशल्ये प्रभावीपणे मांडण्यास मदत होणार आहे. ‘‘लिंक्डइन लर्निंगसोबतचे हे सहकार्य विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्यांपलीकडे जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणारे ठरेल. भविष्यातील कौशल्यांनी परिपूर्ण, उद्योगाभिमुख आणि जागतिक दृष्टिकोन असलेले पदवीधर घडविण्याच्या विद्यापीठाच्या ध्येयाला या उपक्रमामुळे बळ मिळेल. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून आजीवन शिक्षणाची संस्कृती रुजविण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे,’’ असे अमित कोल्हे यांनी सांगितले.

COMMENTS