गडचिरोलीतून अखेर नरभक्षक वाघ जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडचिरोलीतून अखेर नरभक्षक वाघ जेरबंद

गडचिरोली : गडचिरोलीसह चंद्रपूर आणि भंडारा या तीन जिल्ह्यातील तब्बल 13 जणांचा बळी घेणार्‍या ’सिटी-1’ या नरभक्षक वाघाला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला

सुमनबाई वाळुंज यांचे निधन
राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशन संघास विजेतेपद
जलतरण स्पर्धेआधीच बंधाऱ्याला भगदाड, मोठा अनर्थ टळला | LOKNews24

गडचिरोली : गडचिरोलीसह चंद्रपूर आणि भंडारा या तीन जिल्ह्यातील तब्बल 13 जणांचा बळी घेणार्‍या ’सिटी-1’ या नरभक्षक वाघाला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. या वाघाने 13 नागरिकांसह अनेक गुरांचा फडशा पडला होता त्यामुळे तिन्ही जिल्ह्यात या वाघाची मोठी दहशत निर्माण झाली होती.जवळपास आठवडाभरापासून वनविभागाची दोन पथके या वाघाच्या मागावर होती. अखेर गुरुवारी सकाळी वनविभागाने रचलेल्या सापळ्यात हा नरभक्षक वाघ अलगद अडकला तेव्हा त्याला बेशुध्द करून पकडण्यात आले. या कारवाईने वन विभागासह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला असून ही धाडसी कारवाई करणार्‍या पथकाचे सर्व स्तराकडून कौतुक होत आहे.गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक वाघाने गडचिरोली , चंद्रपूर तसेच भंडारा या जिल्ह्यांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. एकामागे एक असे जवळपास 13 जणांचा नागरिकांचा बळी घेतला होता तर कित्येक पाळीव प्राण्यांना आपले भक्ष बनविले होते. त्यामुळे त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच या नरभक्षक वाघाला जेरबंद कसे करायचे या चिंतेत वनविभागासह तिन्ही जिल्ह्यांचे प्रशासन होते. ’सिटी – 1’ या नरभक्षक वाघाने दोन दिवसापूर्वी देसाईगंज जवळच्या वळूमाता प्रक्षेत्रातील एका गाईवर हल्ला करून तिला ठार मारले होते. त्यामुळे हा वाघ त्या ठिकाणी पुन्हा येणार याची खात्री होती. त्यामुळे वनविभागाने ताडोबा येथून बोलावलेले पथक त्याच्यावर पाळत ठेवून होते. या पथकाने वाघासाठी एक सापळा रचून त्याला शिकार म्हणून (बेट) दुसरी एक गाय ठेवली होती. अखेर आज ’सिटी 1’ त्या सापळ्यात अडकल आणि टप्प्यात येताच शूटर टीमने त्याच्यावर बेशुद्धीचे इंजेक्शन (डार्ट) देऊन बेशुध्द केल्याची अशी माहिती वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी माहिती दिली. या वाघाला आता पिंजर्‍यात बंद करून ठेवले जाणार आहे.

COMMENTS