Homeताज्या बातम्याबीड

नीट पेपरफुटी प्रकरण: ’आरसीसी’ क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआय कडून अटक

नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता वेगाने जुळू लागले असून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज लातूर येथील प्रसिद्ध ‘आर

नीट पेपरफुटी प्रकरणाने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी; विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार कोण करणार?
स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्ननीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप; शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर तीव्र टीका
नीट परीक्षा आता 21 जून रोजी होणारपेपरफुटीची सरकारची कबुली ; पुढच्या वर्षांपासून ऑनलाईन होणार परीक्षा



नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता वेगाने जुळू लागले असून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज लातूर येथील प्रसिद्ध ‘आरसीसी’   कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना अटक केली आहे. या देशव्यापी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई करत मोटेगावकर यांना ताब्यात घेतले असून, त्यांना आज विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले जाणार आहे. या अटकेमुळे लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नीट परीक्षेच्या पेपरफुटीचे रॅकेट केवळ राज्यापुरते मर्यादित नसून यात अनेक बड्या संस्थाचालक आणि प्राध्यापकांचा थेट सहभाग असल्याचे तपासात उघड होत आहे. सीबीआयच्या पथकाने गेल्या आठवड्यात मोटेगावकर यांच्या राज्यभरातील विविध कोचिंग सेंटर्सवर एकाच वेळी छापेमारी केली होती. या कारवाईदरम्यान सीबीआयने अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स जप्त केले होते. या पुराव्यांच्या आधारे आणि सखोल चौकशीनंतर आज अखेर मोटेगावकर यांना कायदेशीररीत्या अटक करण्यात आली. आता या संपूर्ण रॅकेटमध्ये त्यांचे नेमके काय संबंध आहेत आणि त्यांनी कोणाकोणाला मदत केली, याचा शोध सीबीआय घेत आहे. यापूर्वी लातूरचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि पुण्याच्या वनस्पतिशास्त्र लेक्चरर मनीषा मांढरे यांना सीबीआयने आधीच अटक केली आहे. तसेच या प्रकरणात थेट नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) अधिकार्‍यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, अटक करण्यात आलेल्या तिन्ही प्राध्यापकांचे आणि संस्थाचालकांचे एकमेकांशी काही आर्थिक किंवा व्यावसायिक संबंध होते का, याचा तपास आता सीबीआयकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पुण्यात बायोलॉजी लेक्चरर म्हणून कार्यरत असलेल्या मनीषा मांढरे यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात झालेल्या कसून चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली होती. सीबीआयच्या दाव्यानुसार, मांढरे या एनटीएच्या पेपर सेटिंग कमिटीमध्ये सामील होत्या आणि त्यांना परीक्षेत कोणते प्रश्न येणार आहेत याची पूर्ण कल्पना होती. त्यांनी परीक्षेपूर्वी पुण्यात एक विशेष कोचिंग क्लास सुरू करून विद्यार्थ्यांना वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्राचे प्रश्न लिहून दिले होते. या कामात त्यांना ब्युटिशियन मनीषा वाघमारे हिने विद्यार्थ्यांना शोधून आणण्यास मदत केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

COMMENTS