Homeताज्या बातम्या

नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्याला अबुधाबीचे परीक्षा केंद्र

नागपूर : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) संदर्भातील वाद आणि तक्रारींची मालिका अद्याप थांबलेली नसतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला

परभणीत सभामंडप कोसळून 7 जणांचा मृत्यू
सरसकट कर्जमाफीसाठी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम  शिंदे शिवसेना शेतकरी सेनेचे राहुरीत आंदोलन
मुखेडच्या मुख्याध्यापकाला 50 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलेबदली करून देणे, नोटीस न देणे आणि ‘हप्ता’ प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
NEET Exam Blunder: नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबुधाबीतील परीक्षा केंद्र,  NTA चा निष्काळजीपणा


नागपूर : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) संदर्भातील वाद आणि तक्रारींची मालिका अद्याप थांबलेली नसतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरमधील एका विद्यार्थ्याला फेरपरीक्षेसाठी थेट परदेशातील अबुधाबी येथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बाब उघड झाली असून, त्यामुळे परीक्षा व्यवस्थापनावर पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागपूरचा रहिवासी अब्दुल्ला मोहम्मद तालिब हा विद्यार्थी नीट परीक्षेची तयारी करत आहे. फेरपरीक्षेसाठी प्रवेशपत्र प्राप्त झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. प्रवेशपत्रात परीक्षा केंद्र म्हणून संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथील एका शैक्षणिक संस्थेचा उल्लेख करण्यात आला होता. विशेष म्हणजे, अर्ज भरताना परदेशातील कोणतेही केंद्र निवडण्यात आले नव्हते, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. विद्यार्थ्याचे वडील मोहम्मद तालिब यांनी सांगितले की, प्रवेशपत्र पाहताच संपूर्ण कुटुंब हादरून गेले. अचानक परदेशातील केंद्र मिळाल्याने विद्यार्थ्यालाही मानसिक धक्का बसला आणि त्याने परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कुटुंबीयांनी त्याची समजूत काढली. संबंधित विद्यार्थ्याकडे पासपोर्टदेखील नसल्याने परदेशात जाऊन परीक्षा देणे शक्यच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकारानंतर कुटुंबीयांनी तातडीने परीक्षा संस्थेच्या मदत केंद्राशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना लेखी तक्रार पाठवण्यास सांगण्यात आले. तक्रार पाठवल्यानंतर संबंधित अधिकार्‍यांकडून संपर्क साधण्यात आला असून, सुधारित प्रवेशपत्र जारी करण्याचे आश्‍वासन देण्यात आल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

COMMENTS