Homeताज्या बातम्या

विठ्ठल नामाच्या गजरात वडवणी ते श्रीक्षेत्र थोरले पंढरी पोखरी पायी दिंडी उत्साहात संपन्न

वडवणी: आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने काळा हनुमान गणेश मंडळ, वडवणी यांच्या वतीने गेल्या २३ वर्षांपासून अखंडपणे आयोजित करण्यात येणारी वडवणी ते श

बीड एसटी महामंडळात शिकाऊ उमेदवारांची भरती
नीट गैरव्यवहार प्रकरण भोवले! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; लोकशाहीपुढे सत्तेलाही झुकावे लागले: अभिजित दीपके
नांदेड शहरातील साई-गणेश देवस्थान, येथे २७ ते २९ जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन; विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

वडवणी: आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने काळा हनुमान गणेश मंडळ, वडवणी यांच्या वतीने गेल्या २३ वर्षांपासून अखंडपणे आयोजित करण्यात येणारी वडवणी ते श्रीक्षेत्र थोरले पंढरी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पोखरी ही पारंपरिक पायी दिंडी यंदाही भक्तिमय वातावरणात आणि अत्यंत उत्साहात संपन्न झाली.

शनिवार, दि. २५ जुलै रोजी सकाळी ८ वाजता काळा हनुमान मंदिर, वडवणी येथून दिंडीला प्रारंभ झाला. “विठ्ठल… विठ्ठल…” आणि “ज्ञानोबा-तुकाराम” यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. टाळ, मृदंग आणि वीण्याच्या गजरात हजारो वारकरी, महिला, पुरुष आणि युवकांनी मोठ्या उत्साहाने दिंडीत सहभाग घेतला. मार्गभर हरिनामाचा अखंड गजर सुरू होता; तर महिलांनी फुगड्या खेळत आणि वारकर्‍यांनी अभंग-भजनाच्या माध्यमातून विठ्ठलभक्तीचा आनंद लुटला.

या पायी दिंडीचे उत्कृष्ट नियोजन शंकर झाडे, जालिंदर चिनके, बबन खाटवकर, नारायण जाधव, वासुदेव लोकरे, गणेश टकले, अमोल डिगे, राहुल टकले, बबन वजीर, माऊली भुजबळ, केतन रेडेकर, सुनील ढोले, गौरव दिवटे, उपमन्यू भागवत, अरुण लोकरे आणि राजेभाऊ खाटवकर यांनी केले.

दिंडीतील भाविकांसाठी नगरसेवक सुधीरभाऊ ढोले, गणेश कुरकुटे, नगरसेवक नागेश डिगे, शिवाजी टकले, अनिल देवकते, गोरख बागडे, संजय पवार, अशोक टकले आणि ज्योतीराम कलेढोण यांच्या वतीने फराळ, फळे तसेच चहा-पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व भाविकांनी मनापासून कौतुक केले. शिस्तबद्ध नियोजन, वारकर्‍यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि अखंड हरिनामाच्या गजरात पार पडलेला हा पायी दिंडी सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला असून मोठ्या हर्षोल्हासात दिंडीचा समारोप झाला.

COMMENTS