Homeताज्या बातम्या

राहुरी पोलीस ठाण्याच्या कारागृहात दारूचा शिरकाव? जेवण पुरवठादाराविरुद्ध गुन्हा, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

देवळाली प्रवरा : राहुरी पोलीस ठाण्याच्या कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना उघडकीस आली आहे. कारागृहातील कैद्यांना जे

राहुरी गोळीबार प्रकरणातील आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद; मुळा धरण परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
समृद्धी महामार्गावर लुटमार करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
अहिल्यानगरमध्ये मोहरम विसर्जन मिरवणूक उत्साहात युवकांचा मोठा सहभाग;  कडेकोट पोलीस बंदोबस्त

देवळाली प्रवरा : राहुरी पोलीस ठाण्याच्या कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना उघडकीस आली आहे. कारागृहातील कैद्यांना जेवण (भत्ता) पुरविणाऱ्या व्यक्तीकडून दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहातील कैद्यांना नियमित अन्नपुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची तपासणी केली. या तपासणीदरम्यान त्याच्याकडे मद्याच्या बाटल्या आढळून आल्याने त्या तात्काळ जप्त करण्यात आल्या. कारागृह परिसरात कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधित वस्तू नेण्यास सक्त मनाई असताना हा प्रकार समोर आल्याने सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

जेवण पुरवठ्याच्या माध्यमातून हा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न झाल्याने, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. या संवेदनशील घटनेमुळे राहुरी पोलीस ठाण्याच्या कारागृहातील सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, प्रशासनाने याप्रकरणी कठोर पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे.

COMMENTS