Homeताज्या बातम्यादेश

6 लग्न करून फसवणूक

झारखंड प्रतिनिधी - मिळालेल्या माहितीनुसार, अस्लम हा 50 वर्षीय आरोपी धनबादमधील भूलीचा रहिवासी आहे. तो पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून मुलीं

डायल 112 वर खोटी माहिती देणे भोवले : फोन करणार्‍या आरोपीविरुद्घ गुन्हा नोंद | LOK News 24
Innova Crysta खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा.
दावणीला बांधलेल्या बैलासमोर नागाने काढला फणा

झारखंड प्रतिनिधी – मिळालेल्या माहितीनुसार, अस्लम हा 50 वर्षीय आरोपी धनबादमधील भूलीचा रहिवासी आहे. तो पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून मुलींना आपल्या जाळ्यात अडकवायचा. अस्लम सातव्यांदा लग्न करण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच दरम्यान त्याची खरी ओळख आणि धर्म कळला. स्वत:ला संजय म्हणवणारा अस्लम घटनास्थळावरून फरार झाला होता.  शहराचे डीएसपी कुलदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस बराच काळ त्याचा शोध घेत होते. त्यानंतर पोलिसांनी अस्लमला रांची येथून अटक केली. त्याच्यावर अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्याशी शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच आदिवासी अल्पवयीन व अल्पसंख्याकांना धमकावून धर्म लपवून 6 वेळा विवाह केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अस्लम लग्नासाठी मुलींसमोर स्वतःला पोलीस अधिकारी म्हणवून घेत असे. त्याच्या अटकेनंतर शहर डीएसपी कुलदीप कुमार म्हणाले की, अस्लमविरुद्ध रांची, धनबाद, तोपचांची आणि चासमध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत. त्याचा गुन्हेगारी इतिहास असून तो 2021 मध्ये एका प्रकरणात तुरुंगातही गेला होता. रिपोर्टनुसार, आरोपी अस्लम पैशाचं आमिष दाखवून मुलींशी लग्न करायचा

COMMENTS