Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपा पथकावर जीवघेणा हल्ला; आरोपींना अटक करा, धिंड काढा-कर्मचार्‍यांचा संताप उसळला; खडकपुरा-वाघी रोडवरील घटनेचा तीव्र निषेध; मनपा प्रवेशद्वारासमोर निषेध सभा

नांदेड : खडकपुरा-वाघी रोड परिसरात अतिक्रमण हटाव कारवाईसाठी गेलेल्या नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या पथकावर समाजकंटकांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्या

मोडाल, तर पोलीस खाक्या दाखवणार-पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार
समन्वयाच्या अभावामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण; जेसीबी चालकावर हल्ल्यानंतर प्रशासनावर टीकेची झोड
नांदेड शहरात रस्त्यावरच कायद्याची धज्जी! ट्रॅफिक पोलिसाची दादागिरी, तरुणाला उघड धमक्या; व्हिडिओ व्हायरल होताच संताप उसळला

नांदेड : खडकपुरा-वाघी रोड परिसरात अतिक्रमण हटाव कारवाईसाठी गेलेल्या नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या पथकावर समाजकंटकांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड वाघाळा महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीने मनपा प्रवेशद्वारासमोर जोरदार निषेध सभा घेण्यात आली. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांची शहरातून धिंड काढावी, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली.
4 मे रोजी मनपाचे अतिक्रमण हटाव पथक खडकपुरा-वाघी रोड येथे कारवाईसाठी गेले होते. अतिक्रमण हटवित असताना काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी अचानक पथकावर हल्ला चढवला. यावेळी जेसीबी चालक मालू कांबळे यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कांबळे यांना वाचविण्यासाठी धावून गेलेले प्रसन्नजित औताडे यांनाही मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर मनपा कर्मचार्‍यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. निषेध सभेत बोलताना युनियनचे संस्थापक अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करताना, महानगरपालिकेचे कर्मचारी शहरासाठी काम करत असताना त्यांच्यावर हल्ले होणे अत्यंत गंभीर बाब आहे. आरोपींना तात्काळ अटक करून शहरातून धिंड काढली पाहिजे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. यावेळी मध्यवर्ती शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण नरमलवार यांनीही उपस्थित राहून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. निषेध सभेला महिला व पुरुष सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनपा कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

COMMENTS