Homeताज्या बातम्या

नांदेड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात निकृष्ट दर्जाची तुरटी चढ्या भावाने खरेदी; ४२ लाखांच्या तुरटीसाठी तब्बल १ कोटीचा खर्च?

नांदेड - नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या दुसर्‍या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा विभागासाठी खरेदी करण्यात येणार्‍या तुरटीच्या दर्जा आणि दरावरून प्रशास

अहिल्यानगर शहर बंदची आज हाक; धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर हिंदू संघटना आक्रमक
ज्येष्ठांसाठी १५ कलमी ’हक्क चार्टर’ लागू करा; डॉ. हंसराज वैद्य यांची केंद्र व राज्य शासनाकडे आग्रही मागणी
भारतीय मजदूर संघाचे १७ ऑगस्टला धरणे आंदोलन
NANDED WAGHALA CITY MUNICIPAL CORPORATION, NANDED

नांदेड – नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या दुसर्‍या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा विभागासाठी खरेदी करण्यात येणार्‍या तुरटीच्या दर्जा आणि दरावरून प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली. प्रथम दर्जाची तुरटी पुरविण्याऐवजी संबंधित कंपनीकडून दुय्यम दर्जाची तुरटी पुरविल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी केला. विशेष म्हणजे, ४२ लाख रुपयांच्या तुरटीसाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च कसा येतो? असा सवाल सदस्यांनी उपस्थित केल्याने सभागृहात खळबळ उडाली. शहरातील पाणीशुद्धीकरण प्रक्रियेत तुरटीचा महत्त्वाचा वापर होत असल्याने तिच्या दर्जाशी तडजोड करणे हा गंभीर विषय असल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या पैशातून होणार्‍या खरेदीत दर्जा, दर आणि निविदा प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक असताना त्यातच त्रुटी आढळत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील तुरटी खरेदीचा मुद्दा यापूर्वीही अनेकदा सर्वसाधारण सभेत गाजला आहे. यंदाही निविदा प्रक्रियेत प्रशासनाकडून चूक झाल्याचे सभेत मान्य करण्यात आले. त्यामुळे निविदा कोणत्या निकषांवर काढण्यात आली, पुरवठा झालेल्या तुरटीचा दर्जा कोणी तपासला आणि बाजारभावाच्या तुलनेत एवढी मोठी रक्कम का मोजली जात आहे, असे सवाल सदस्यांनी उपस्थित केले. दरम्यान, महापालिका आयुक्तांनी भविष्यातील खरेदी प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण देताना, आणीबाणीची परिस्थिती नसल्यास पुरवठादाराने सादर केलेले दर अमान्य करून बाजारभावानुसार दर निश्चित करण्याचा अधिकार महापालिकेकडे राखून ठेवणारा करार केला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, केवळ भविष्यातील खरेदी प्रक्रिया सुधारण्याचे आश्वासन देऊन हा विषय संपणार नाही, अशी भूमिका सदस्यांनी घेतली. यापूर्वी झालेल्या तुरटी खरेदीतील दर, दर्जा आणि निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. ४२ लाखांच्या तुरटीचा खर्च एक कोटींपर्यंत कसा पोहोचला, याचा हिशेब प्रशासनाने स्पष्ट करावा, अशी मागणी सभागृहात करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होऊन जबाबदारी निश्चित केली जाणार का, याकडे आता नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS