Homeताज्या बातम्या

भाळवणी परिसरात केबल चोरांचा सुळसुळाट; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिस गस्तीची मागणी

भाळवणी - पारनेर तालुक्यातील भाळवणी व परिसरातील वाडी-वस्त्यांवर गेल्या पंधरा दिवसांपासून विद्युत पंपांच्या केबल चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत.

१०० व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’साठी १८ कोटींचा निधी; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा
जामखेड कडकडीत बंद! दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचे तीव्र पडसाद; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत तहसीलवर सर्वपक्षीय मोर्चा
“आमचा एकही आमदार फुटणार नाही!” – खासदार शरद पवारांचा बारामतीत ठाम विश्वास
रीवा मे चोरों ने दिया बिजली विभाग को लाखों का करंट शॉक, क्विंटल में  कॉपर-एल्युमिनियम गायब

भाळवणी – पारनेर तालुक्यातील भाळवणी व परिसरातील वाडी-वस्त्यांवर गेल्या पंधरा दिवसांपासून विद्युत पंपांच्या केबल चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गालगतच्या नागबेंदवाडी, कपाळे मळा, पिराचा मळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपांच्या केबल अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी चोरून नेल्या आहेत.

पंधरा दिवसांत सलग दुसऱ्यांदा केबल चोरीच्या घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्युत पंपांच्या केबल चोरीमुळे सिंचन व्यवस्था विस्कळीत होत असून, नवीन केबल खरेदी व दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी शेत परिसरात वर्दळ कमी असल्याचा फायदा घेत चोरटे विद्युत पंपांच्या केबल लक्ष्य करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या घटनांमुळे शेतातील साहित्याच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, या चोरीच्या घटनांचा तातडीने तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा तसेच परिसरात रात्रीची पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे. सततच्या चोरीच्या घटनांमुळे पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

COMMENTS