पाथर्डी : आज भारतामध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये झालेल्या विकासात तसेच भारतातील ग्रंथालय चळवळीत सर्वाधिक योगदान पद्मश्री डॉ. एस. आर. रंगन

पाथर्डी : आज भारतामध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये झालेल्या विकासात तसेच भारतातील ग्रंथालय चळवळीत सर्वाधिक योगदान पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे आहे. त्यामुळे त्यांना भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक म्हणतात. डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी ग्रंथालयशास्त्राच्या पाच मूलभूत सूत्रांची मांडणी केली. जागतिक कीर्तीच्या पद्मश्री डॉ. रंगनाथन यांचे कार्य भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बबन चौरे यांनी केले. ते येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या ग्रंथालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना डॉ. चौरे म्हणाले, आजच्या डिजिटल युगात व सोशल मिडीयाच्या काळातही ज्ञान मिळवण्याचा सर्वात विश्वासहार्य मार्ग म्हणजे ग्रंथालय होय. ग्रंथालय हेही एक व्यवस्थापनशास्त्र असून त्याकडे समाजभिमुख दृष्टीने पाहिले जावे हा विचार सर्वप्रथम डॉ रंगनाथन यांनी मांडला. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगत युगामध्ये ग्रंथालये व ग्रंथपालांनी वाचकांना पुन्हा ग्रंथालयांकडे वळविण्यासाठी जोमाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्राचीन किंवा वर्तमान विषयाचा अभ्यास करायचा असो, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा किंवा कोणत्याही साहित्याचा अभ्यास करायचा असो, एखाद्या कर्तुत्वान माणसाचे चरित्र हवे आहे. हे सर्व साहित्य मिळविण्याचे ठिकाण म्हणजे ग्रंथालय होय. ग्रंथालय हे गरीब विद्यार्थ्यांसाठी वरदान आहे. महापुरुषांची चरित्रे आणि उपदेशात्मक कथा लोकांचे जीवन बदलवतात. आजच्या युगात वाचनाची आवड कमी झाली नसून त्याचे मूळ स्वरूप बदलले गेले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. सखोल ग्रंथवाचन मग ते कोणत्याही क्षेत्रातले असो संपूर्ण माहिती ग्रंथाद्वारेच मिळते. नवीन शैक्षणिक धोरणात ग्रंथालयाला महत्वाचे स्थान देण्यात आले असून ग्रंथालय हे प्रत्येक महाविद्यालयाचा आत्मा आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात ग्रंथालयाची व ग्रंथपालाची भूमिका महत्वाची आहे. यावेळी ग्रंथपाल डॉ. किरण गुलदगड, पर्यवेक्षक प्रा सलीम शेख, डॉ. अरुण राख, डॉ भगवान सांगळे, प्रा आशा पालवे, प्रा माया पवार, अभिजीत आव्हाड, सुनिता पालवे, मेघा पोहरे, गौरव एडके व विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS