Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात उष्णतेचा तडाखा ; विदर्भात तापमान 44 अंशांपार

मुंबई : राज्यभर उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून विदर्भ, मराठवाडा आणि कोकणासह महाराष्ट्रातील बहुतांश भाग उष्णतेने अक्षरशः होरपळत आहे. विदर

कोठडीतल्या महिलेकडे केली तिच्या मुलीची मागणी; पोलिस अधिकार्‍याचे निलंबन, संतापाची लाट
उन्हाळी गर्दी कमी करण्यासाठी नांदेड-आसनसोल दरम्यान विशेष गाडी
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा; अकोले दिव्यांग क्रांती संघटनेची मागणी
IMD अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचे इशारे जारी करते; महाराष्ट्र आणि  कर्नाटकात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त

मुंबई : राज्यभर उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून विदर्भ, मराठवाडा आणि कोकणासह महाराष्ट्रातील बहुतांश भाग उष्णतेने अक्षरशः होरपळत आहे. विदर्भातील अकोला येथे तापमानाने 44 अंशांचा टप्पा ओलांडत उच्चांक गाठला असून, देशातील तसेच जगातील उष्ण शहरांच्या यादीत त्याची गणना होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर संबंधित जिल्हा प्रशासनाने सज्जतेचा इशारा देत आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत.
अकोल्यात तापमान 44.2 अंशांवर पोहोचताच जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी तातडीची बैठक घेऊन विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. उष्माघाताच्या रुग्णांसाठी जिल्ह्यातील शासकीय व ग्रामीण रुग्णालयांत 137 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात जनजागृतीसाठी दवंडी देण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक आरोग्य केंद्रात जीवनसत्वयुक्त द्रावण व आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. नागपुरातही उष्णतेचा प्रकोप तीव्र असून तापमान 44 अंशांच्या आसपास स्थिरावले आहे. येथे उष्माघातग्रस्त रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विशेष थंड कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षात थंडावा निर्माण करणारी यंत्रणा तसेच थंड पाण्याच्या स्नानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली. विदर्भातील इतर शहरांमध्येही तापमान उच्चांकी पातळीवर आहे. वर्धा येथे 44 अंश, अमरावती 43.4, चंद्रपूर 43, गडचिरोली 42.6, गोंदिया 40.6 आणि बुलढाणा 39.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातही उष्णतेची तीव्रता कमी झालेली नाही. परभणी व हिंगोली येथे सलग पाच दिवसांपासून तापमान 41 अंशांच्या वर राहिले आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असून नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत.
दरम्यान, पुणे शहरातही तापमान झपाट्याने वाढत असून आज शुक्रवारी 17 एप्रिल रोजी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचू शकते. मात्र 18 व 19 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने नागरिकांसाठी काही खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. दुपारी बारा ते सायंकाळी चार या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, तहान नसली तरी पुरेसे पाणी प्यावे, तसेच लिंबूपाणी किंवा जीवनसत्वयुक्त द्रावणाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उन्हात बाहेर पडताना सुती वस्त्रे, डोक्याचे संरक्षण करणारे साधन वापरणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे. चक्कर येणे, डोके दुखणे किंवा मळमळ जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

COMMENTS