Homeताज्या बातम्या

माहूर येथील श्री कपिलेश्वर मंदिरात श्रीमद् संगीतमय भागवत कथा सप्ताहास प्रारंभ; ७ दिवस धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी

माहूर : श्री दत्तात्रय संस्थान माहूरगडाचे महंत डॉ. धनेश्वर भारतीजी महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने माहूर येथील श्री कपिलेश्वर मंदिरात श्रीमद् संगी

नळातून पाणी नव्हे, आजारांचा पुरवठा! गांधीनगरमध्ये ६ महिन्यांपासून दूषित पाणी; नागरिकांचा संताप शिगेला
देवळाली प्रवराचे सेवानिवृत्त पोलिस उपाधीक्षक नानासाहेब होले यांचे नर्मदा परिक्रमेदरम्यान दुर्दैवी निधन
कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरच पूर्णत्वाकडे

माहूर : श्री दत्तात्रय संस्थान माहूरगडाचे महंत डॉ. धनेश्वर भारतीजी महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने माहूर येथील श्री कपिलेश्वर मंदिरात श्रीमद् संगीतमय भागवत कथा सप्ताहास मंगळवारी (दि. ९ जून) उत्साहात प्रारंभ झाला आहे. अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य धार्मिक सोहळ्यामुळे माहूर व परिसरात संपूर्ण भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

या सप्ताहात दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ आणि रात्री ८ ते १० या वेळेत नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये ह.भ.प. गायत्रीताई चाटे, ह.भ.प. पंकजाताई डोईफोडे, भागवताचार्य कल्पनाताई हिरासिंग ठाकूर, भागवताचार्य अनुपमाताई आळंदीकर आणि ह.भ.प. ओमसतीताई कानोजवार यांची कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत. सोमवार, दि. १५ जून रोजी व्यसनमुक्ती सम्राट ह.भ.प. मधुकर महाराज खोडे यांचे काल्याचे कीर्तन होईल आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल.

सप्ताहाची सांगता अधिक ज्येष्ठ अमावास्येला ह.भ.प. शारदासुत खामनकर महाराज यांच्या शिदोरी काल्याने व प्रवचनाने होणार आहे. दरम्यान, या सप्ताहाच्या निमित्ताने श्रीक्षेत्र माहूर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता श्री कपिलेश्वर मंदिरापासून प्रस्थान करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन माहूरचे सर्व ग्रामस्थ, व्यापारी व उत्सव मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS