कर्जतमध्ये दहा लाखांची लूट ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमध्ये दहा लाखांची लूट ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कर्जत :;प्रतिनिधी कर्जतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतीत आडत दुकानदाराची लूट झाल्याचा धक्कादायक प्रकार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडला होत

जिल्हा परिषदेच्या 10 शाळा खोल्यांना 1.20 कोटी निधी मंजूर
जमिनीच्या वादातूनच पत्रकार दातीर यांची हत्या ; आरोपपत्र दाखल
पाट-पाण्याच्या आर्वतनांचे काटेकोर नियोजन करावे

कर्जत :;प्रतिनिधी

कर्जतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतीत आडत दुकानदाराची लूट झाल्याचा धक्कादायक प्रकार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडला होता. आडत दुकानदार रवींद्र कोठारी यांचे चिरंजीव पियुष यांनी अर्बन बँकेतून व्यवसायासाठी काढून आणलेली दहा लाखांच्या रकमेची बॅग पळवण्यात आली होती. मात्र ही बॅग तेथे काम करणाऱ्या दोन हमालांनीच पळवून नेल्याचे समोर येत आहे.

सोमनाथ विठ्ठल साळुंके, प्रमोद विजय आतार, (दोघे रा. कोरेगाव, ता. कर्जत) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी पियुष रवींद्र कोठारी यांनी कर्जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आडत दुकानदार रवींद्र कोठारी यांनी शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या मालाचे पैसे देण्यासाठी मुलगा पियुष याला नगर अर्बन बँकेच्या शाखेमधून दहा लाख रुपये काढून आणण्यास सांगितले होते.

दरम्यान त्यांच्याच आडत दुकानांमध्ये हमाली काम करत असलेल्या सोमनाथ साळुंके व प्रमोद आतार यांनी आमचे गावामध्ये काम आहे, ते करून परत आलो असे म्हणून ते बाजार समितीच्या बाहेरील रस्त्यावर येऊन थांबले. दरम्यान बँकेमधून दहा लाख रुपये घेवून दुचाकीवरून पियुष कोठारी हे येत असताना संशयितांनी त्यांना रस्त्यातच हाक मारली व गाडी थांबवण्यास सांगितले. आपल्याच दुकानातील हमाल हाका मारत असल्यामुळे ते त्यांच्याजवळ थांबले. तेवढ्यात त्यांनी दुचाकीला अडकवलेली पैशाची बॅग हिसकावली व दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संशयित आरोपी हे त्यांचेच नोकर आहेत.

चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक

COMMENTS