Homeताज्या बातम्यामराठवाडा

लोक अदालतीत महापालिकेची 1.46 कोटींची मालमत्ता कर वसुली

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत तब्बल 1 कोटी 46 लाख रुपयांचा

तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्‍न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन
कोपरगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची तपासणी
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची प्रक्रिया 8 तासांत होणार पूर्णनवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला गती



जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत तब्बल 1 कोटी 46 लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला. ही लोक अदालत 9 मे रोजी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडली.
मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर सकाळी 10.30 वाजल्यापासून लोक अदालतीस सुरुवात झाली. थकबाकीवरील शास्तीत 80 टक्के सूट योजनेचा लाभ घेत एकूण 753 मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे, न्यायाधीश डी. एस. निंबाळकर, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार यांनी मालमत्ताधारकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निरसन केले व कायदेविषयक मार्गदर्शन केले. लोक अदालतीस प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन. के. ब्रम्हो, सचिव विधी सेवा प्राधिकरण एस. जी. देशपांडे, ड.समीउल्ला खान, सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे तसेच मनपाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही त्यांनी तातडीने कर भरणा करून जप्ती, नळबंद, ड्रेनेज बंद किंवा लिलाव यांसारख्या कारवाया टाळाव्यात, असे आवाहन आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.

COMMENTS